स्पर्धा परीक्षाभारतातील नद्या व नदी प्रणाली भाग - 1 (Indian rivers and river...

भारतातील नद्या व नदी प्रणाली भाग – 1 (Indian rivers and river system part -1)

जाणून घ्या भारतीय नदी प्रणाली बद्दल .. विविध स्पर्धा परीक्षा मध्ये अत्त्यंत महत्वाचा मुद्दा व आपल्या दैनंदिन जीवनात उपयुक्त अशी माहिती..

भारतीय नदी प्रणाली ( Indian river system) :-

भारताच्या वेगाने होणाऱ्या प्रगती मध्ये नद्या एक महत्त्वाचा घटक आहे. नद्यांमुळे जनजीवनावर उपयुक्त असा परिणाम होतो. नदी किनारी व्यापार , उद्योग , जनजीवन, शेती  अश्या अनेक मनुष्य जीवनाला उपयुक्त असे घटक सुरू होतात . यामुळे माणसाच्या प्रगतीला मोठा हात लागतो .

---------

   भारतात नद्यांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. नदीला माता , जननी , देवी म्हणून पुजले जाते . नदी किनारी भागात लोकसंख्या वाढत जात आहे . भारतातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्र हे नदीच्या तीरावर वसलेले आहेत . त्यामुळे भारतीय नद्यांचा अभ्यास करणे हे भारतीय भूगोल जाणून घेऊन विवध लोकांना जाणण्याचा मुख्य आधार आहे .

प्रामुख्याने भारतीय नदी प्रणाली दोन पद्धतीत विभाजित केली जाते.
१) हिमालयीन नद्या( River system of himalyan drainage)
२) प्रायद्वीपीय नद्या(The indian peninsular drainage system)

१) हिमालयीन नद्या (Himalyan rivers ):-

भारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदीचे विहंगत दृश्य …. Picture credit – pixabay

या नद्यांना हिमालयीन नद्या म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांचा उगम हा हिमालयात होतो. हिमालयातील बर्फ वितळून या नद्या अस्तित्वात येतात किंवा त्यांना पाणी मिळते. या कारणामुळे सर्व नद्या बारा महिने वाहतात त्यांना कायमवाहू नद्याही म्हणले जाते.

हिमालयात वाहणाऱ्या मुख्यतः नद्या या हिमालयाच्या निर्माण होण्याच्या अगोदर पासून आहेत. या नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह खूप वेगवान असतो.  पाणी सुरवातीला अनेक छोटे मोठे धबधबे तयार होतात. या नद्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात.या मध्ये मुख्यतः तीन नदी प्रणाली आहेत.

 • सिंधू नदी प्रणाली(The indus drainage system )
 • गंगा नदी प्रणाली ( The ganga drainage system )
 • ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली ( The brahmaputra drainage system )
--------------

हिमालयीन नद्यांमध्ये खालील नद्यांचा समावेश होतो .

 • गंगा
 • यमुना
 • ब्रह्मपुत्रा
 • तिस्ता
 • सतलज
 • सिंधू
 • आदि…..

२) प्रायद्वीपीय नद्या ( Peninsular rivers ) :-

दक्षिण गंगा मानली जाणारी गोदावरी नदीच्या पात्राचे विहंगत दृश्य… ही नदी दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे .

या नद्या भारतीय मुख्य पठारावर उगम पावतात . या नद्यांना पाण्याचा मुख्य सोत्र हा मान्सूनने आलेला पाऊस असतो.  सोबतच डोंगरातून झिरापणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा पण या नद्यांचा एक मुख्य सोत्र आहे. या नद्या मुख्यतः बारा महिने वाहत नाहीत. यांचा पाण्याचा प्रवाह येणाऱ्या उन्हाळा सोबत हळू हळू कमी होत जातो.

- Advertisement -

दक्षिण भारतात मुख्यतः  सर्व शहरे हे  या नद्यांच्या काठावर वसलेले आहेत.  काही नद्या पश्चिमेला वाहत जाऊन अरबी समुद्रात जाऊन मिळतात तर काही पूर्वेला जाऊन बंगालच्या उपसागरात मिळतात.प्रायद्वीपीय नद्यांना खालीलप्रमाणे विभागता येत.  

 • पुर्ववाहू नद्या ( या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात )
 • पश्चिमवाहू नद्या ( या नद्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात )

प्रायद्विपीय नद्यांमध्ये खालील नद्यांचा समावेश होतो.

 • गोदावरी
 • कृष्णा
 • कावेरी
 • नर्मदा
 • तापी
 • महानदी
 • पेरियार
 • आदि….

काही तज्ज्ञांच्या मते भारतीय नद्यांना वेगळ्या दोन पद्धतीत विभाजित केले गेले आहे.
१) अरबी समुद्रात जाऊन मिळणाऱ्या नद्या
२) बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणाऱ्या नद्या

परंतु भारतातील मुख्यतः सर्वच नद्या बंगालच्या खाडीत जाऊन मिळतात . याचे मुख्य कारण पश्चिम घाटामुळे तयार झालेला नैसर्गिक उंचवटा आहे. यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे नैसर्गिक उतार झाला आहे व पाणी उताराच्या दिशेने वाहते हा पाण्याचा गुणधर्म आहे.  या कारणामुळे हे विभाजन योग्य रितीने होत नाही.

   पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत हिमालयीन नद्या बद्दल पूर्ण माहिती तरी वाचत रहा stay updated…

- Advertisement -

आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. आपल्या Stay Updated या मॅगझीनला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शेतकरी, विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

नक्की आवडेल

- Advertisement -

More article