पाककृतीबनवा स्वादिष्ट पालक पनीर ...!!!

बनवा स्वादिष्ट पालक पनीर …!!!

तर मित्रांनो मागील काही लेखांपासून आपण जाणून घेत आहोत विविध प्रकारच्या स्वादिष्ट पाककृती घरी बनवण्याच्या पद्धती .. तसेच या लेखात आपण जाणून घेणार आहोत स्वादिष्ट पालक पनीर बनवण्याची पद्धत …

पालक पनीर भाजी ही स्वादिष्ट तर असतेच पण सोबत या भाजीतून आपल्याला व्हिटॅमिन्स , कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात मिळतात . मुख्यतः या भाजीचा समावेश मुलांच्या खाण्यात करावा कारण मुलांच्या आहारात पालेभाज्याचा समावेश असणे आवश्यक आहे . परंतु मुख्यतः लहानमुळे पालेभाज्या खात नाहीत . तरी या भाजीचा उपयोग होऊ शकतो .

सामग्री ( MATERIAL ):-

 • 2 जुड्या पालक
 • पनीर-४०० ग्रॅम
 • मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला) कांदा
 • टोमॅटोची प्युरी
 • हिरव्या मिरच्या -३/४
 • तेल- 1–2 मोठे चमचे
 • जीरे-१ टी स्पून
 • लवंगा -२/३
 • हिंग-१ टी स्पून
 • आले -लसणाची पेस्ट-२ टी स्पून
 • लाल मिरची पावडर-१ टी स्पून
 • हळद पावडर-१ टी स्पून
 • धणे पावडर-१ टी स्पून
 • गरम मसाला-१ टी स्पून
 • लहान चमचा कुस्करलेली कसुरी मेथी (सुकविलेली मेथी)
 • ताजी साय-२/३ टी स्पून (इच्छेनुसार)
 • चवीनुसार मीठ

कृती ( ACTION ) :-

स्वादिष्ट पालक पनीर भाजी …
---------

1 ) पालकाची पाने देठापासून वेगळी करावीत आणि स्वच्छ धुवून घ्यावी. थोडे पाणी उकळून घ्यावे, पालकाची पाने त्यात 2–3 मिनिटे ठेवावीत आणि पाने आकसू लागल्यावर आंच बंद करावी, पाण्यातून पाने काढावीत आणि पाणी नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवावे.

२ ) पनीर क्यूब शेप मध्ये कापून घ्या.

३ ) पालक थंड झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालून त्याची प्युरी बनवावी.

४ ) पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, हिंगलवंगा टाकाव्यात, नंतर त्यात चिरलेला कांदाआले, लसणाची पेस्ट घालावी. मंद आचेवर चांगले परतून घ्यावे .

--------------

५ ) कांदा मऊ झाल्यावर आणि व्यवस्थित परतल्यावर त्यात मसाला पावडर (गरम मसाला सोडून) व मीठ घालून चांगले तळून घ्यावे, जास्त कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी शिंपडा.

६ ) मसाला चांगला शिजल्यावर टोमॅटो प्युरी टाकावी आणि कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आणि मिश्रणातून तेल बाहेर पडेपर्यंत शिजू द्यावे. पुन्हा थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्यावी.

- Advertisement -

७) त्यानंतर त्यात पालक प्युरी व साखर टाकावी आणि व्यवस्थित मिसळून घ्यावे. रस्सा 1–2 मिनिटे शिजवून घ्यावा आणि गरम मसाला टाकून एकजीव करून घ्यावे.रस्सा तयार करीत असताना दुसरीकडे पनीर कोमट पाण्यात 5–10 मिनिटे भिजवून ठेवावे. त्यानंतर पनीरचे तुकडे काढून सरळ रश्यात टाकावेत. आपल्या इच्छेनुसार रस्सा जाड किंवा पातळ करायचा ते ठरवावे आणि त्यासाठी पालका उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.

८ ) पनीर घातल्यावर रस्सा 2–3 मिनिटे शिजवावा. आता कसूरी मेथी व ताजी साय टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि मग आच बंद करावी.

काळजी घ्यावी ( TAKE CARE ) :-

1 ) पालक जास्त शिजू नये म्हणून सावधगिरी घ्यावी, नाहीतर रस्सा गडद हिरवा होण्याऐवजी काळा होईल आणि त्यातील पोषक तत्त्वे देखील निघून जातील.

2 ) पनीर गरम पाण्यात भिजवण्याऐवजी , रश्यात पनीर घालण्यापूर्वी तुम्ही ते थोड्याशा तेलात स्लो फ्राय करू शकता.

3 ) साय घालणे ऐच्छिक आहे, परंतु त्यामुळे चव चांगली होते आणि रस्सा जास्त मलाईदार बनतो.

4 ) साखर घालून तुम्ही टोमॅटोमुळे होणार्‍या पित्ताचे संतुलन करू शकता आणि त्यामुळे ताज्या पालकाचा हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी देखील मदत मिळते.

तरी या लेखात आपण जाणून घेतले स्वादिष्ट पालक पनीर बनवण्याची कृती . आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व अधिक माहितीसाठी वाचत रहा STAY UPDATED …

- Advertisement -

आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. आपल्या Stay Updated या मॅगझीनला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शेतकरी, विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

नक्की आवडेल

- Advertisement -

More article