दिवसभरातील घडामोडी वाचा एक क्लिकवर.. । १४ एप्रिल २०२१

दिवसभरातील घडामोडी वाचा एक क्लिकवर.. । १४ एप्रिल २०२१

दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली, सीबीएसई बोर्डाचा निर्णय
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 4 मे पासून सुरु होणारी सीबीएसईची बारावीची परीक्षा लांबणीवर ढकलण्यात आली आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेबाबत एक जूनला फेरआढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर किमान 15 दिवस आधी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात गारांचा पाऊस; आंबा, द्राक्षे अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
सातारा, नंदुरबार, धुळे, जालना, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

---------

ताडोबा व्याघ्र प्रकल्प 30 एप्रिल पर्यंत पर्यटकांसाठी बंद; बुकींग रक्कम परत मिळणार…
राज्यातील कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत आजपासून नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी आणि बफऱ मधील सर्व उपक्रम बंद राहणार आहेत.

काँग्रेसने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वत:चे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म INC TV यूट्यूबरवर लाँच… काँग्रेसची विचारधारा आणि काम जनतेपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी यूट्यूबर एका चॅनलची सुरुवात केल्याचा पक्षाचा दावा

जे लोक व्यायाम करीत नाहीत, अशा लोकांमध्ये कोरोना मृत्यूची शक्यता अधिक… आळशीपणामुळे किंवा संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी बसणे ठरणार कोरोनासोबत लढताना घातक , नवीन संशोधनातून झाले जाहीर

रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला;
पौराणिक कथा रामायण तुम्ही स्टार भारत या चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता पाहू शकाल. स्टार भारत चॅनलने ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली…

--------------

2006 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ सुपर हिट चित्रपट ‘अनियन’ चा हिंदीमध्ये डब केलेला हिंदी चित्रपट म्हणजेच ‘अपरिचित’चा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार … रणवीर सिंग साकारणार मुख्य भूमिका , आपल्या इन्स्टाग्रामवर दिली माहिती

भारतावर जोरात चढू लागला IPL चा रंग … आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) विरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा (SRH ) सामना

- Advertisement -

आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. आपल्या Stay Updated या मॅगझीनला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शेतकरी, विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

नक्की आवडेल

- Advertisement -

More article