- Advertisement -

इस्राईल आणि पॅलेस्टाईनमध्ये हा वाद का ?

वाढत्या तणावामुळे यरुसलेम (Jerusalem)मध्ये हिंसाचार सुरुच आहे. हा संघर्ष तसा बर्‍याच काळापासून सुरु आहे. अशा परिस्थितीत आपण इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील या वादाचे कारण समजून घेऊ या.

इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाढत्या संघर्षामुळे मोठ्या प्रमाणावर संभाव्य युद्धाचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. वाढत्या तणावामुळे यरुसलेम (Jerusalem)मध्ये हिंसाचार सुरुच आहे. हा संघर्ष तसा बर्‍याच काळापासून सुरु आहे. अशा परिस्थितीत आपण इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील या वादाचे कारण समजून घेऊ या.

वाद कधी सुरू झाला?

- Advertisement -

पहिल्या महायुद्धात ओटोमन साम्राज्याचा (Ottoman Empire)पराभव झाला. यानंतर ब्रिटनने पॅलेस्टाईनचा ताबा घेतला. ही जमीन प्रामुख्याने अरब आणि ज्यू लोकांच्या ताब्यात होती. येथे अरब लोकं बहुसंख्य होते. हळूहळू अरब आणि ज्यू लोकांमध्ये तणाव वाढू लागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांनी घरे स्थापित करण्यासाठी ब्रिटनला जबाबदार धरले.

दुसर्‍या महायुद्धाच्या आधी आणि नंतर काय झाले?

1920 ते 1940 दरम्यान मोठ्या संख्येने ज्यू लोकं पॅलेस्टाईनमध्ये येऊ लागले. यामागील एक कारण म्हणजे ज्यू लोकांना युरोपमध्ये छळ सहन करावा लागला होता. तसेच याचे दुसरे कारण म्हणजे, या युद्धा नंतर ज्यू लोकां स्थलांतर करुन, नवीन घर बांधून आपली वस्ती तयार करायची होती. यामुळे ही लोकं युरोपहून पॅलेस्टाईनकडे जाऊ लागले. परंतु पॅलेस्टाईनमध्ये ज्यू, अरब आणि ब्रिटिश यांच्यात वाद वाढू लागला.

1947 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला ज्यू आणि अरब राज्यात विभाजन करण्याची घोषणा केली. यरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहर बनले गेले. या गोष्टीला ज्यू नेत्यांनी मान्यता दिली. परंतु अरबांनी कधीही ती स्वीकारली नाही किंवा अंमलात आणली नाही.

इस्राईल कसा बनला?

1948 मध्ये ब्रिटनने पॅलेस्टाईन सोडला आणि ज्यू नेत्यांनी इस्राईल तयार करण्याची घोषणा केली. पॅलेस्टाईन जनतेने याला विरोध केला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी युद्ध झाले. या युद्धादरम्यान अनेक शेजारच्या अरब देशांनी इस्राईलवर हल्ला केला. यामुळे लाखो पॅलेस्टिनी आपल्या घरातून पळून गेले

पॅलेस्टाईन लोकं याला ‘अल नकबा’ किंवा ‘आपदा’ म्हणून आठणीत ठेऊ लागले. 1949 मध्ये युद्धाचा अंत झाला आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्याच वेळी, युद्धानंतर जॉर्डनच्या ताब्यात घेतलेली जमीन वेस्ट बँक आणि इजिप्त-व्याप्त जागा गाझा म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर यरुसलेम पश्चिम आणि पूर्वेकडून जॉर्डन आणि इस्राईलमध्ये विभागला गेला.

पॅलेस्टाईनचा नकाशा कसा आहे?

बहुतेक पॅलेस्टाईन लोकं गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमध्ये राहतात. ते जॉर्डन, सीरिया आणि लेबेनॉनमध्ये राहतात. या लोकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी नाही. यामागील कारण म्हणजे इस्राईलने असे म्हटले आहे की, यामुळे राज्याचे मोठे नुकसान होईल. इस्राईल गाझाबाहेर पडला असला तरी इस्राईलने अजूनही वेस्ट बँकवर कब्जा केला आहे.

- Advertisement -

गेल्या 50 वर्षात इस्राईलने वेस्ट बँकमध्ये अनेक वस्त्या उभारल्या आहेत. सध्या या वस्त्यांमध्ये सुमारे सहा लाख ज्यू राहतात. पॅलेस्टाईनचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार ते बेकायदेशीर आहे, परंतु इस्राईलने ते नाकारले आहे.

आता परिस्थिती काय?

इतिहासाची पाने पलटल्यावर असे दिसून येते की, इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात तणाव वाढण्याची ही पहिली वेळ नाही. गाझावर पॅलेस्टाईनची अतिरेकी संस्था हमास राज्य करत आहे. या संघटनेने बर्‍याच वेळा इस्राईलबरोबर युद्ध केले आहे.

गाझा आणि वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांचे म्हणणे आहे की, इस्राईली कारवाई आणि निर्बंधामुळे त्यांना त्रास होत आहे. यावर्षी एप्रिलच्या मध्यापासून सुरू झालेल्या रमजानच्या काळात तणाव वाढला आणि पॅलेस्टाईन लोकं आणि इस्त्रायली पोलिसांमध्ये चकमक उडाली. पॅलेस्टाईन कुटुंबांना पूर्व येरूसलेममधून घालवून देण्याच्या धमक्यांमुळे हा तणाव वाढला आहे.

तणावाचे मुख्य मुद्दे कोणते आहेत?

इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांना संघर्ष संपविण्यासाठी असे अनेक मोठे प्रश्न आहेत ज्यांच्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. पॅलेस्टाईन राज्य स्वतंत्रपणे इस्राईल सोबत राहू शकतो का? हा पहिला मुद्दा आहे. तसेच यरुसलेमला इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांनी सामायिक करावे? ज्यू वसाहती हटवाव्यात की नाहीत? यासह अन्य मुद्द्यांचा समावेश आहे.

पॅलेस्टिनी नागरिकांबाबत ब्रिटनचं चुकलं असं तुम्हाला वाटतं का? ब्रिटननं गुन्हा केला आहे का?” असा प्रश्न शिक्षकांनी पॅलेस्टीनच्या वेस्ट बँकमधील रामाल्लाह इथल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विचारला.
उत्तरादाखल सर्वच विद्यार्थ्यांनी हात वर केले. ‘हो’ असं 15 वर्षीय मुलगी म्हणाली.

“हा जाहीरनामा बेकायदेशीर होता. कारण, पॅलेस्टीन ऑटोमन साम्राज्याचा भाग होते आणि ब्रिटिशांनी त्यावर नियंत्रण मिळवलं नाही,” असं ती सांगते.
अरब हे संख्येने 90 टक्क्यांपेक्षा जास्त होते, तरी ब्रिटनने त्यांना अल्पसंख्य समजलं,” असं ती पुढं सांगते.

लवकरच यावर तोडगा निघू शकेल का?

संघर्षाचा त्वरित अंत होऊ शकत नाही किंवा कोणताही तोडगा निघू शकत नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराचा प्रस्ताव दिला होता. परंतु पॅलेस्टाईननी ती योजना एकतर्फी आणि इस्राईलच्या बाजूने असल्याचे सांगून नाकारली.

एक योजना किंवा करार तेव्हाच अमलात आणली जाईल जेव्हा हे दोन्ही पक्ष मोठ्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यास किंवा तडजोडीसाठी सहमत होतील. असे होईपर्यंत, दुर्दैवाने तेथील तणाव कमी होण्याची शक्यता नाही.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Subscribe Today

GET EXCLUSIVE FULL ACCESS TO PREMIUM CONTENT

SUPPORT NONPROFIT JOURNALISM

EXPERT ANALYSIS OF AND EMERGING TRENDS IN CHILD WELFARE AND JUVENILE JUSTICE

TOPICAL VIDEO WEBINARS

Get unlimited access to our EXCLUSIVE Content and our archive of subscriber stories.

Exclusive content

- Advertisement -Newspaper WordPress Theme

Latest article

More article

- Advertisement -