Petrol Disel Rates : सलग 15 दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र कायम; जाणून...

Petrol Disel Rates : सलग 15 दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र कायम; जाणून घ्या आजचे दर

[ad_1]

परभणी : मागच्या 15 दिवसांपासून सुरु असलेले इंधन दरवाढीचे सत्र कायम असुन आज पेट्रोल हे 18  तर डिझेल 30  पैशांनी महागले. आहे ज्यामुळे  उस्मानाबाद आणि सोलापूर वगळता मराठवाड्यातील सर्वच शहरात पेट्रोल 100 रुपयांच्या वरती तर डिझेल हि 90 रुपयांच्या वरती गेले आहे.म्हणुन सर्वत्रच इंधन दरवाढीचा भडका उडालाय. मुंबईत पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. मे महिन्यात दिल्लीतही आतापर्यंत पेट्रोल 2.69 रुपये आणि 3.07 रुपयांनी महागलं आहे. 

---------

बंगालसह इतर 4 राज्यांच्या निवडणूका झाल्या आणि इंधन दरवाढ सुरु झाली. 4 मे ते आज 21 मे या 17 दिवसांमध्ये पेट्रोलचे दर हे 2 रुपये 36 पैसे तर डिझेल चे दर 2 रुपये 87 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे पेट्रोल पाठोपाठ डिझेल हि लवकरच शंभरी पार करण्याची शक्यता आहे.आज सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे परभणीत असुन पेट्रोल 101.71 पैसे,डिझेल 91.93 पैसे या दराने विक्री केले जात आहे. सतत वाढणाऱ्या या इंधनाच्या दरांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असुन याचा परिणाम हा ऑटो भाडेवाढ, कृषी माल पुरवठा करणारी वाहन दर,ट्रांसपोर्टींगचे दर कमालीचे वाढले असुन याचा भार थेट सामान्य नागरिकांच्या खिश्यावर पडतोय त्यामुळे सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडत आहे.वारंवार मागणी करून हि इंधन दर कमी होत नसल्याने सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

मागच्या 2 वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊन मुळे सामान्य नागरिक अगोदरच हैराण झालाय अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात,उद्योग धंदे ठप्प झालेत,रोजगार निर्मिती होत नाहीये त्यात हि वाढत जाणारे इंधन दर सामान्य माणसाचे जगने मात्र मुश्किल करत आहे.त्यामुळे केंद्र सरकार ने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे बनले आहे.  

इंधन दरवाढ झाल्यानंतर मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आजचे इंधन दर

परभणी
पेट्रोल 101.71 पैसे
डिझेल 91.93 पैसे

--------------

नांदेड
पेट्रोल 101.49
डिझेल 91.73

जालना
पेट्रोल-100.51
डिझेल- 90.64

- Advertisement -

हिंगोली
पेट्रोल 100.33 पैसे
डिझेल 90.63 पैसे

बीड
पेट्रोल -100.38
डिझेल -90.64

उस्मानाबाद
पेट्रोल-99.78
डिझेल- 90.08

सोलापुर
99.19 – पेट्रोल 
89.52 – डिझेल 
102.60 – extra प्रीमियम

औरंगाबाद 
पेट्रोल-100.30
डिझेल- 90.16

[ad_2]

First Upload On Petrol Disel Rates : सलग 15 दिवसांपासून इंधन दरवाढीचे सत्र कायम; जाणून घ्या आजचे दर

- Advertisement -

आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. आपल्या Stay Updated या मॅगझीनला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शेतकरी, विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

नक्की आवडेल

- Advertisement -

More article