करिअर न्यूजIndian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Jobs 2021:भारतीय तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांवर भरती

Indian Coast Guard Navik and Yantrik Recruitment 2021 Notification:

भारतीय तटरक्षक दलातर्फे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार जानेवारी २०२२ बॅचसाठी नाविक जनरल ड्यूटी (GD),नामिक डोमेस्टिक ब्रांच (DB) आणि यांत्रिक पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आयसीजी (ICG)चे अधिकृत संकेतस्थळ joinindiancoastguard.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

नाविक (जनरल ड्यूटी) आणि यांत्रिकसाठी अलॉटमेंट ट्रेडमध्ये निवड होणारे पात्र उमेदवारांचे बेसिक ट्रेनिंग फेब्रुवारी २०२२ पासून आयएनएस चिल्का ((INS Chilka) मध्ये सुरु होईल. एप्रिल २०२२ मध्ये नविक प्रशिक्षण सुरु आहे.

[ad_1]

नविक (जनरल ड्यूटी) – काऊन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्यूकेशन (COBSE)च्या मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेकडून मॅथ्स आणि फिजिक्ससह बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

नाविक – बोर्ड ऑफ स्कूल एज्यूकेशन(COBSE) मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी पास असणे आवश्यक आहे.

यांत्रिक – बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारा मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी पास आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE)तर्फे मान्यता प्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार (रेडियो / पॉवर) इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे.

इंडियन कोस्ट गार्ड जीडी भरती २०२१ (Indian Coast Guard GD Recruitment)साठी २ जुलै २०२१ पासून अर्ज सुरु होतील. पात्र उमेदवारांनी १६ जुलै २०२१ किंवा त्याआधी निर्धारित अर्ज करावा. नोटिफिकेशनची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे.

वॅकेंसी डिटेल्स (ICG Vacancy 2021 Details)
भारतीय तट रक्षक जीडी भरती २०२१ मध्ये विविध पदांवर एकूण ३५० रिक्त पदे आहेत. यामध्ये नविक जनरल ड्यूटी)-२६० पद, नाविक -५० पद, यांत्रिक- २० पद, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – १ पद आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – ७ पदांचा समावेश आहे.

वयोमर्यादा
१८ वर्षापासून २२ वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात.

[ad_2]

पगार
नाविक जनरल ड्यूटी आणि डोमेस्टिक ब्रांच पदावर भरती होणाऱ्या उमेदवारांना पे लेवल-३ अंतर्गत २१ हजार ७०० रुपये बेसिक पगार आणि इतर भत्त्यांचा लाभ मिळेल. यांत्रिक पदासाठी बेसिक पे २९ हजार २०० रुपये (पे लेवल-५) आणि DA सहित इतर भत्त्यांचा लाभ मिळेल.

Indian Coast Guard 01/2022 Batch नोटिफिकेशन लिंक
अधिकृत वेबसाईटची लिंक

कोस्टगार्ड भरतीसाठी उपयुक्त पुस्तके :

अरिहंत प्रकाशनाचे :

 

Firstly Uploaded On : Source link

आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. आपल्या Stay Updated या मॅगझीनला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भागात तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात शेतकरी, विद्यार्थी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

नक्की आवडेल

- Advertisement -

More article