ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत. देशातील बऱ्याच कुटुंबांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. भारतातील बहुतेक कुटूंबांचे व लोकांचा उपजीविकेचा मुख्य मार्ग हा शेती व शेती संबंधित व्यवसाय बनलेला आहे. शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी शेतीची व्याख्या देता येईल.

शेती म्हणजे काय ? What is Agriculture in Marathi

शेती म्हणजे मातीची मशागत करून त्यात बियाणांची लागवड करून पीक घेणे होय. शेतीची व्याख्या हि शेतकरी खूप चांगल्या प्रकारे समजू व समजावू शकतो, कारण शेतकऱ्याची नाळ हि लहानपानापासून शेतीशी जोडलेली असते. शेतीपासून आपल्याला दैनंदिन जीवनात आवश्यक असलेलं सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अन्न मिळत, तसेच शरीरावर आपण जे कपडे परिधान करत असतो त्यासाठी लागणारे कापडसुद्धा याच शेतीत पिकणाऱ्या कापसापासून तयार करण्यात येते.

शेतीचे प्रकार । Types of Agriculture in Marathi

शेतीमधून घेण्यात येणाऱ्या पिकांच्या उत्पादनावरून शेतीची वेगवेगळे प्रकारही पडले आहेत. जसे कि, भातशेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती, फळबाग शेती, फुलबाग शेती, भाजीपाल्याची शेती, इ. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार जिरायती शेती, बागायती शेती, दुर्जल शेती असे शेतीचे काही प्रकार पडतात. शेतामध्ये वापर करण्यात येणाऱ्या खतांच्या वापरावरूनही शेतीचे सेंद्रिय शेती, आणि रासायनिक शेती असे प्रकार पडतात. हरितगृहातील शेती, रोपवाटिका शेती, फिरती शेती, वनशेती असे काही अन्य शेतीचे प्रकार आहेत. तसेच सध्या पाण्यावरसुद्धा पीक घेतले जाते त्यास Aquaponic farming(एक्वापोनिक शेती) असे म्हटले जाते.

- Advertisement -

सेंद्रिय शेतीला जैविक तंत्रज्ञानाने केली जाणारी शेती असे नाव काही शास्त्रज्ञांनी दिले आहे. या शेतीला भविष्यातील शेती असेही म्हटले जाते. आपल्या भारत देशाचा विचार केला तर स्वातंत्र्यापूर्वी भारतात सेंद्रिय शेती केली जात होती. सिक्कीम हे संपूर्ण जैवीक शेती करणारे भारतातील पहिले राज्य आहे.

शेतीमध्ये कोणकोणती कामे केली जातात । What kind of work is done in agriculture?

शेतीतील कामे पुढीलप्रमाणे आहेत जसे नांगरणी(नांगरट), वखरणी, पेरणी, लावणी, निंदणी, खुरपणी, कापणी, झोडपणी, मळणी (रगडनी), उफणणी, इत्यादी शेतीची कामे आहेत.

शेतीत घेतली जाणारी काही पिके । Crops grown in agriculture in Marathi

शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असंख्य पिके घेतली जातात. आपण त्यातील काही शेतीत घेतली जाणाऱ्या पिकांची नावे पाहुयात.

धान्य – ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी, इत्यादी.

कडधान्य – मूग, मटकी, तूर, उडीद, हुलगा, इत्यादी.

फळे – केळी, चिकू, सफरचंद, पेरू, लिंबू, संत्रा, इत्यादी.

फुले – झेंडू, मोगरा, गुलाब, जाई, चाफा, इत्यादी.

तसेच तंबाकू, ऊस, लाकूड, लसूण, कांद्यासारखी आणखी बरीच पिके शेतीत पिकवली जातात.

हि पिके शेतीतील मातीवर, हवामानावर तसेच पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबू असतात.

शेतीचे महत्व । Importance of Agriculture or Farming in Marathi

माणूस आधुनिकीकरणाकडे जरी आपले पाऊल टाकत असेल. तरीही शेती अजूनही खूप महत्वाची आहे. संपूर्ण जगातील असा एकही माणूस नसेल कि जो शेतीवर अवलंबून नाही. आपल्याला उदर्निर्वाहासाठी लागणारे अन्न शेतीतूनच मिळत असते.

बरीच उत्पादने घेण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा मुख्य स्रोत हा शेती व्यवसाय आहे. उदाहरण द्यायचे झाले तर, साखर बनविण्यासाठी शेतीत पिकणाऱ्या उसाचा उपयोग केला जातो. तसेच कापड तयार करण्यासाठी लागणारा कापूस याच शेतीत पिकवत असतो.

आता तुम्हाला शेतीचे आपल्या जीवनात किती महत्व आहे हे समजलेच असेल.

अशा प्रकारे या पोस्टमध्ये आपण शेतीविषयी माहिती मराठीमध्ये – Agriculture Information in Marathi पाहिली आहे. जर तुम्हाला या पोस्टमध्ये काही चूक आढळून आल्यास आम्हाला खाली कमेंन्ट करून किंवा खाली दिलेल्या आमच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट्सवर कळवा.

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 3 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024