ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

आपल्या भारत देशात लोकशाही पद्धतीने शासनव्यवस्था चालत आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी म्हणजेच सामान्य जनतेने आपल्यामधीलच एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊन त्या लोकप्रतिनिधीद्वारे चालविण्यात येणाऱ्या शासनपद्धतीस लोकशाही असे म्हटले जाते. याच लोकप्रतिनिधींमध्ये स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सभापती, आमदार, खासदार पासून पंतप्रधान, राष्ट्रपती यांचा समावेश होतो. या सर्वांची निवड ही जनतेमधून किंवा जनतेने निवडून दिलेल्या जनप्रतिनिधीद्वारे केली जाते.

या पोस्ट्मध्ये आपण राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

राष्ट्रपतीविषयी सविस्तर माहीती । Detailed information about the President in Marathi

राष्ट्रपतींना देशाचे प्रथम नागरिक असे मानले जाते. घटनेनुसार त्यांना ‘अग्रतेचा’ मन दिला जातो. भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

- Advertisement -

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते ?

जसे आपण आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस प्रत्यक्ष मतदार केंद्रावर जाऊन ग्रामपंचायत सदस्याला व सरपंच निवडून देत असतो. तसे राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या जनतेकडून केली जाते. म्हणजेच जनतेने निवडून दिलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात.

राष्ट्रपतीपदासाठी एक व्यक्ती किमान २ वेळा निवडणूक लढवू शकतो/शकते.

राष्ट्रपती पदासाठी निवडणूकीचा अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे.

राष्ट्रपतीपदासाठी जर कोणाला उमेदवारी अर्ज भरायचा असेल तर सर्वात महत्वाचे तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. म्हणजेच त्या व्यक्तीकडे भारताचे राष्ट्रीयत्व हवे.

त्या उमेदवाराचे वय ३५ वर्षे असले पाहिजे. तसेच राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज करणारा उमेदवार हा संसद व घटकराज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा.

राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती आहे ?

कलम ८३ नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो. हा कार्यकाळ संपण्याअगोदर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. हा राजीनामा राष्ट्रपती उपराष्ट्रपतींकडे देतात.

राष्ट्रपतींना वेतन/ पगार किती असते.

राष्ट्रपतीला दरमहा १,५०,००० रु. वेतन प्राप्त होते. तसेच इतर सुविधा व भत्ते राष्ट्रपतींना मिळत असतात. कार्यकालीन कामांसाठी होणाऱ्या देश-विदेश दौऱ्यासाठी लागणारा खर्च राष्ट्रपतींना मिळतो.

राहण्यासाठी राष्ट्रपती भवन हे निवासस्थान राष्ट्रपतींना मिळत असते.

इतर माहीती

 • भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत.
 • भारतीय संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे.
 • राष्ट्रपतींना देशाचे प्रथम नागरिक असे मानले जाते. घटनेनुसार त्यांना ‘अग्रतेचा’ मन दिला जातो.
 • देशाचा कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालत असला तरी प्रत्यक्ष देशाचा राज्यकारभार प्रधानमंत्री न्यायमंडळ व मंत्रिमंडळाद्वारे चालविला जातो.
 • राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत. तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख असतात.
 • भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदेमंडळाच्या घटक असतात.
 • लक्ष द्या :
 1. कलम ४७ : नुसार मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्ये पार पाडतील .
 2. कलम ५२ : नुसार घटनेने राष्ट्रपती पदाची निर्मिती केलेली आहे म्हणून राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात.
 3. कलम ५३ (१) : नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना प्राप्त झालेली आहे.
 4. कलम ५४ : राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने पुढील निर्वाचक गणाच्या सदस्यांमधून होते.
 5. कलम ५४(A) : नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे म्हणजेच लोकसभा व राज्यसभेमधून निवडून आलेले सदस्य.
 6. कलम ५४ (B) : घटकराज्याच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य.
 7. कलम ५९ : नुसार राष्टपतीपदाचा उमेदवार संसद व घटकराज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा.
 8. कलम ८३ : राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो.
 9. कलम १२४ : नुसार राष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतो.
 10. कलम ३५२ : नुसार बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याची सुरक्षितता धोक्यात आल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो.
 11. कलम ३५६ : नुसार एखाद्या घटकराज्यांत राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.
 12. कलम ३६० : नुसार संपूर्ण देशात किंवा विशिष्ट घटकराज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.

भारताचे राष्ट्रपती व त्यांचा कार्यकाल (अनुक्रमे)

 1. डॉ. राजेंद्र प्रसाद (२६ जानेवारी १९५० – १३ मे १९६२)
 2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१३ मे १९६२ – १३ मे १९६७)
 3. झाकीर हुसेन (१३ मे १९६७ – ३ मे १९६९)
 4. वराहगिरी वेंकट गिरी (३ मे १९६९ – २० जुलै १९६९)
 5. मोहम्मद हिदायतुल्ला (२० जुलै १९६९ – २४ ऑगस्ट १९६९)
 6. वराहगिरी वेंकट गिरी (२४ ऑगस्ट १९६९ – २४ ऑगस्ट १९७४)
 7. फक्रुद्दीन अली अहमद (२४ ऑगस्ट १९७४ – ११ फेब्रुवारी १९७७)
 8. बी. डी. जत्ती (११ फेब्रुवारी १९७७ – २५ जुलै १९७७)
 9. नीलम संजीव रेड्डी (२५ जुलै १९७७ – २५ जुलै १९८२)
 10. झैल सिंग (२५ जुलै १९८२ – २५ जुलै १९८७)
 11. रामस्वामी वेंकटरमण (२५ जुलै १९८७ – २५ जुलै १९९२)
 12. शंकरदयाळ शर्मा (२५ जुलै १९९२ – २५ जुलै १९९७)
 13. के. आर. नारायणन (२५ जुलै १९९७ – २५ जुलै २००२)
 14. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (२५ जुलै २००२ – २५ जुलै २००७)
 15. प्रतिभा पाटील (२५ जुलै २००७ – २५ जुलै २०१५)
 16. प्रणव मुखर्जी (२५ जुलै २०१२ – २५ जुलै २०१७)
 17. रामनाथ कोविंद ( २५ जुलै २०१७ – ..)

वरील लेखामध्ये आपण राष्ट्रपतीबद्दल माहिती घेतली आहे. जर राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi या लेखामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून किव्वा खालील आमच्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर मेसेज करून आमची चूक आमच्या निदर्शनास आणून देऊ शकता.

- Advertisement -

Related articles

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 3 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024