कोराना विषाणूविरुद्धच्या (Coronavirus) युद्धात जगभरातून भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा होत आहे. आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी कोरोना विषाणू विरोधी लस (Covid-19 Vaccine) घेतली आहे. मोदी सरकार आता अपंग आणि वृद्धांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की जर कोणी लस घेतली नाही तर, त्या व्यक्तीच्या घराची वीज वीज कापली जाईल आणि त्यांचे रेशन कार्डही जप्त केले जाईल.
हा फोटो सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आता वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि उपलब्धींची माहिती देणारी अग्रणी एजन्सी पीआयबीने हा दावा फेटाळला आहे. पीआयबीने याबाबत ट्वीट करून लोकांना त्याबाबत माहिती दिली आहे. पीआयबीने सांगितले आहे की, भारत सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही.
पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे- ‘एका फोटोमध्ये असा ‘खोटा दावा’ केला जात आहे की ज्यांनी कोविड-19 लस घेतली नाही, त्यांच्या घरातली वीज कापली जाईल व त्यांचे रेशन कार्ड जप्त केले जाईल. कोविड लसीकरण बंधनकारक नाही परंतु कोरोना टाळण्यासाठी हे पूर्णपणे आवश्यक आहे. लसी नक्की घ्या.’
याआधी असाच एक मेसेज व्हायरल झाला होता ज्यामध्ये दावा केला होता की, कोरोना लसीमध्ये ग्राफिन ऑक्साईड असून, कोरोना विषाणू लस म्हणजे लोकांना मारण्याचे षडयंत्र आहे. मात्र हा दावाही खोटा असल्याचे समोर आले.
दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.
Source : Tweeter & Latestly