ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Highest Paid Cricket Captains: बाबो! विराट कोहली नव्हे या देशाचा कर्णधार घेतो सर्वाधिक पगार, बाबर आजम लाखात खेळतो; पहा टॉप-10 कर्णधारांची यादी

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

Highest Paid Cricket Captains: बाबो! विराट कोहली नव्हे या देशाचा कर्णधार घेतो सर्वाधिक पगार, बाबर आजम लाखात खेळतो; पहा टॉप-10 कर्णधारांची यादी

Highest Paid Cricket Captains: भारतीय संघाचा (Indian Team) सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटर आहे. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार कोहली हा भारतीय बोर्डाच्या ग्रेड ए+ करारातील खेळाडूंपैकी एक असून वर्षाला 7 कोटी रुपयांचे मानधन घेतो. शिवाय, त्याचा आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझी सोबत 17 कोटींचा आयपीएल करार देखील आहे. कोहली हा सध्या विश्व क्रिकेटमध्ये सर्वाधिक मानधन मिळणार क्रिकेटपटू असला तरी, जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून त्याच्या पगाराचा विचार केला तर तो सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार आणि खेळाडू नाही आहे. इंग्लंडचे कसोटी क्रिकेटपटू भारताच्या ग्रेड ए + खेळाडूंपेक्षा जास्त कमाई करतात. आणि यामध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट (Joe Root) आघाडीवर आहे. रूटला इंग्लंड बोर्डाकडून वर्षाला तब्बल 8.97 कोटी रुपयांचे मानधन दिले जाते.

[ad_1]

- Advertisement -

विशेष म्हणजे रूट नाही तर जोफ्रा आर्चरही रेड बॉल कॉन्ट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंमध्ये असून भारतीय कर्णधारापेक्षा जास्त पगार घेतो. कोहली व्यतिरिक्त रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह देखील बीसीसीआयच्या ग्रेड ए+ करारात सामील आहेत. ते देखील प्रत्येकी 7 कोटी रुपये पगार घेतात. इतकंच नाही तर विराटचा प्रतिस्पर्धी मानला जाणारा पाकिस्तानी कर्णधार बाबर आजम अद्याप लाखात खेळत आहे. त्याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (पीसीबी) शीर्ष श्रेणीत (श्रेणी अ) करार केला आहे. म्हणूनच, स्टार फलंदाजाचे वार्षिक वेतन 13.2 लाख PKR आहे, जे अंदाजे 62.40 लाख रुपये आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हर संघाचा कर्णधार आरोन फिंच आणि कसोटी कर्णधार टिम पेन यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून प्रत्येकी 4.87 कोटी रुपये वेतन मिळते. सर्व देशांतील कर्णधारांना त्यांच्या राष्ट्रीय मंडळाच्या निकष, धोरण आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर वेगवेगळे वेतन मिळते.

[ad_2]

सर्वाधिक वेतन घेणाऱ्या टॉप-10 कर्णधार

जो रूट– 8.97 कोटी

विराट कोहली– 7 कोटी

आरोन फिंच आणि टिम पेन– 4.87 कोटी

डीन एल्गार – 3.2 कोटी

टेंबा बावुमा – 2.5 कोटी

केन विल्यमसन – 1.77 कोटी

इयन मॉर्गन– 1.75 कोटी

कीरोन पोलार्ड – 1.73 कोटी

क्रेग ब्रेथवेट – 1.39 कोटी

बाबर आजम – 62.40 लाख

Source link

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024