मित्रांनो , मागील भारतीय विज्ञान आणि सभ्यतेचा वारसा – 1 या लेखात प्राचीन भारतीय संकल्पना जसे धर्म , वर्णव्यवस्था , शिल्प- तंत्रज्ञान , राज्यव्यवस्था व तत्वज्ञान यांची चर्चा केली .तरी या लेखात आपण विज्ञान मुख्यतः खगोलशास्त्र व गणित या विषयावर चर्चा करणार आहोत .
विज्ञान :-
प्राचीन काळात भारतामध्ये धर्म आणि विज्ञान न सोडवता येणाऱ्या गुंतागुंतीने एकमेकांशी जोडले गेले होते. भारतात खगोलशास्त्रने आणि खूपच प्रगती केली; कारण आकाशस्थ ग्रह देव मानले गेले आणि त्यांच्या हालचालीचे लक्षपूर्वक निरीक्षण करण्यास प्रारंभ झाला. ऋतूबद्दल आणि हवामानाच्या स्थितीशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. ऋतू बद्दल आणि हवामानाची बदलती स्थिती या बाबी शेतीची कामे पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. व्याकरणाचे शास्त्र व भाषाशास्त्र यांचाही प्राचीन भारतात उदय झाला; कारण प्राचीन ब्राह्मण प्रत्येक व वैदिक प्रार्थना व मंत्र यांच्या पठणातील बारीकसारीक तपशीलातील शुद्धतेवर भर देत असत. खरे म्हणजे या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या परिणाम सुरू भारतीयांनी संस्कृत व्याकरणाची निर्मिती केली. इ. स. पूर्व चौथ्या शतकात पाणिनीने संस्कृत भाषेचे नियमन करणाऱ्या सर्व नियमांचे सुव्यवस्थित संकलन करून अष्टाध्यायीं नावाचा व्याकरणग्रंथ तयार केला.
इ. स. पूर्व सुमारे तिसऱ्या शतकात गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र या तीनही शाखा स्वतंत्रपणे विकसित होण्यास सुरुवात झाली. गणिताच्या शाखेत प्राचीन भारतीयांनी पुढील तीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची भर घातली अंकलेखन दशमान पद्धती व शुन्याचा वापर. दशमान पद्धतीच्या उपयोगाचे सर्वात प्राचीन उदाहरण इसवीसनाच्या पाचव्या शतकात आढळते. भारतीय अंक लेखन पद्धती आत्मसात केली व त्यांनी तिचा पाश्चिमात्य जगात प्रसार केला. भारतीय बँकांना इंग्रजीत अरेबिक असे संबोधले संबोधले जाते. परंतु अरब त्यांच्या भाषेत हिंडसा या संज्ञाचा वापर अंकासाठी करतात. पाश्चिमात्य जगाला अंकाची ओळख होण्यापूर्वी भारतात शेकडो वर्षे त्याचा वापर होत होता. इ.स. पूर्व तिसर्या शतकातील अशोकाच्या कोरीव लेखात अंकांचा वापर केलेला आढळतो.
गणित :-
दशमान पद्धतीचा वापर प्रथम भारतीयांनी केला. विख्यात गणितज्ञ (इ.स.४७६ ते ५००) आर्यभट्टाचा दशमान पद्धतीशी परिचय होता. बौद्ध धर्मप्रसारकांकडून चिनी लोक दशमान पद्धती शिकले.अरब भारतीयांच्या संपर्कात आल्यावर अरबांनी ती पद्धत आत्मसात केली. पाश्चिमात्य जगातील देशांनी ती अरबांकडून उचलली. इ. स. पूर्व सुमारे दुसर्या शतकात भारतीयांनी शून्याचा शोध लावला. जेव्हापासून शून्याचा शोध लावला तेव्हापासून भारतीय गणितज्ञांनी स्वतंत्र अंक म्हणून तिचा गणिती कृत्यात वापर केला. अरबस्थानात शून्याचा सर्वात प्राचीन उपयोग इसवीसन 876 मध्ये केलेला आढळतो. अरब चुन्याचा वापर करण्यास शिकले ते भारतीयांकडून. त्याचा स्वीकार करून त्यांनी शून्याचा युरोपात प्रसार केला. जरी भारतीयांनी व ग्रीकांनी बीजगणिताच्या शाखेत भर घातली तरी पश्चिम युरोपातील देशांनी बीजगणिताचे ज्ञान ग्रीकांकडून न मिळवता अरबांकडूनआत्मसात केले. अरबांनी भारतीयांकडून बीजगणिताचे ज्ञान प्राप्त केले होते.
वायव्य भारतातील लोकांना मोजमापाचे व भूमितीचे उत्तम ज्ञान असल्याचे हडप्पातील विटांच्या बांधकामावरून दिसून येते. वैदिक लोकांना ज्ञान याचा नक्कीच फायदा मिळाला असावा. मोजमाप व भूमिती यासंबंधीचे उल्लेख इ. स. पूर्व पाचव्या शतकातील शुल्यसूत्रात केलेले आढळतात. राजेलोकांना यज्ञयागाकरता लागणाऱ्या यज्ञविधीच्या बांधकामासाठीच्या व्यवहारिक भूमितीची निर्मिती इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात आपस्तंबाने केली. या भूमितीत लघुकोन, विशालकोन व विषालकोनाचे वर्णन केले आहे. आर्यभट्टाने त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र तयार केले. त्यातूनच त्रिकोणमितिचा पाया घातला गेला. सूर्यसिद्धांत हे या कालखंडातील सर्वात प्राचीन पुस्तक त्यासारखे महत्वाचे पुस्तक समकालीन पूर्वेकडील देशात आढळत नाही.
खगोलशास्त्र :-
आर्यभट्ट आणि वराहमिहीर हे खगोलशास्त्रातील सर्वात सुप्रसिद्ध विद्वान होते. आर्यभट्ट व वराहमिहिर हे दोघे अनुक्रमे इसवीसन सणाच्या पाचव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेले. चंद्रग्रहण व सूर्यग्रहण एका होतात ते त्याने शोधून काढले. त्याने अंदाजाच्या सहाय्याने केलेल्या पृथ्वीच्या परिघाचे मोजमाप आजही अचूक मानले जाते. सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते याकडे त्याचे लक्ष वेधले. आर्यभटाने शीर्षकाचे पुस्तक लिहिले.
बृहत्सहिता हा वराहमिहिराच्या प्रसिद्ध ग्रंथ इसवी सनाच्या सहाव्या शतकातील आहे. चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो व पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, असे त्यांने प्रतिपादन केले. ग्रहांच्या गतीचे संबंधी स्पष्टीकरण करण्यासाठी व काही खगोलशास्त्रीय समस्या सोडवण्यासाठी वराहमिहिराने विविध ग्रीक ग्रंथाचा वापर केला. भारतीय खगोलशास्त्रावर ग्रीकांच्या त्यासंबंधीच्या ज्ञानाचा प्रभाव पडला असला तरीही भारतीयांनी या विषयाचा पाठपुरावा करून अधिक ज्ञान मिळवले व त्या ज्ञानाचा वापर ग्रहांचे निरीक्षण करताना केला.
आपण या लेखात भारतातील विज्ञान व सभ्यतेमध्ये विज्ञानाच्या मुख्यतः खगोलशास्त्र व गणित या विषयांची चर्चा केली . पुढील माहितीसाठी वाचत रहा STAY UPDATED …