ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

भारतीय नद्या व नदी प्रणाली भाग -4 ( INDIAN RIVER & RIVER SYSTEM PART – 4)

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

नमस्कार , मागील लेखात आपण जाणून घेतले हिमालयीन नदीप्रणालीतील गंगा नदी व तिच्या मुख्य उपनद्या बद्दल . आता या लेखात आपण जाणून घेणार आहेत ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या उपनद्या बद्दल .

ब्रह्मपुत्रा नदी :-

जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्या यादीत ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश होतो . ही नदी चीन , भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . या नदीचा जगात लांबी नुसार 15 वा तर आकारानुसार 9 वा क्रमांक येतो .जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला कांचनजुंगा हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे . ही नदी मुख्यतः एका प्रवाहात वाहत नाही तर सोबत अनेक प्रवाह घेऊन वाहते . या प्रकारच्या नद्यांना ब्रेडेड नद्या ( BREADED RIVERS ) म्हणून ओळखल्या जातात .

उगम :- चेमायूनगडूनग हिमनदी , कैलास पर्वत रांग ( तिबेट )

- Advertisement -

लांबी :- 3080 किमी

ब्रह्मपुत्रा ही ईशान्य भारतातील सर्वात महत्वाची नदी आहे . या सोबतच या नदीला पुराणिक महत्वही आहे . या नदीचे जुने संस्कृत नाव लोहित्य असे आहे . तिबेट मध्ये या नदीला स्टंगपो या नावाने ओळखले जाते .

प्रवाह :-

उगम झाल्यानंतर ही नदी 1200 किमी हिमालय पर्वताला समांतर चालते . या काळात ती स्टंगपो या नावाने ओळखली जाते . नंतर अरुंद दरी बनवून पूर्णतः दक्षिण बाजूला वळते व भारतात अरुणाचल प्रदेश राज्यात येते . भारतात सुरवातीला ही नदी सिआंग या नावाने ओळखली जाते . नंतर अरुणाचल प्रदेशच्या मैदानी भागात ही नदी दिहाँग नावाने ओळखली जाते . थोडे पुढे प्रवाहित झाल्यावर दिहाँग नदीला दिबांग व लोहित्य या नद्या मिळतात व या नद्यांच्या संगमाचे नाव ब्रह्मपुत्रा असे होते .

आसामच्या मैदानात ब्रम्हपुत्रा मोठे विक्राळ रूप धारण करते . काही ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र 20 किमी पेक्षा मोठे होते . जगातील सर्वात मोठे नदी द्वीप हे भारतात ब्रह्मपुत्रा नदी तयार करते . या द्वीपचे नाव मजुली द्वीप असे आहे . या नदीचा सर्वात छोटा प्रवाह हा गुवाहाटी जवळ आहे . या भागात नदी 1 किमी इतकी निमुळती होते .

ब्रह्मपुत्रा भारतातून बांगलादेश मध्ये जाताना पुन्हा एक दक्षिणेकडे वळण घेते . ही नदी बांगलादेश मध्ये जमुना म्हणून प्रसिद्ध आहे . पुढे जाऊन ही नदी पुन्हा 2 प्रवाहांमध्ये विभाजित होते . यातील एक जमुना व एक जुनी ब्रह्मपुत्रा म्हणून प्रसिद्ध आहे . हीच नदी पुढे गंगेसोबत मिळून जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात . हाच त्रिभुज प्रदेश सुंदरबन म्हणून प्रसिद्ध आहे .

सुंदरबन प्रदेश ( भारत , बांगलादेश ) ..

ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या :-

ब्रह्मपुत्रा नदीला भारतातील ईशान्य भारतातील खूप नद्या मिळतात . यातील काही हिमालयात उगम पावतात तर काही ईशान्य भारतातील डोंगर व मैदानावर उगम पावतात .

उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :-

  • सुबंसिरी
  • कामेंग
  • बाढ नदी
  • मानस
  • संकोश
  • तिस्ता

डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या :-

  • दिबांग
  • लोहित
  • दिहिंग
  • दीखोऊ
  • धनसिरी
  • कोपीली

सुरवातीला आपण पाहू ब्रह्मपुत्रा नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या मुख्य उपनद्या .

1) सुबंसिरी :-

उगम :- तिबेट , चीन

ही ब्रह्मपुत्रा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे . या नदीला तेथील लोक सुवर्ण नदी असेही म्हणतात . ही नदी जगात सोन्याचे कण वाहून आणण्यासाठी प्रसिद्ध आहे .

2) कामेंग :-

उगम :- तवांग जिल्हा , अरुणाचल प्रदेश

ही नदी पूर्व हिमालयाच्या भागातून उगम पावते . या नदीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही नदी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून वाहते . याच नदीला भराली/ जिया भराली असे म्हणूनही ओळखले जाते . ही तेजपुर मध्ये ब्रह्मपुत्रा नदीला मिळते .

3 ) बाढ नदी :-

उगम :- भूतान

ही नदी भूतान व भारत या देशांतून वाहते . भारतात येऊन आसाम मध्ये गुवाहाटी जवळ ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते .

4 ) मानस :-

उगम :- भूतान

ही नदी भारत व भूतान या देशांतून वाहते . या नदीचा उगम हिमालयाच्या पायथ्याला होतो . ही नदी भूतान मधील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे . या नदी किनारी रॉयल मानस राष्ट्रीय उद्यानमानस वन्यजीवन अभयारण्य आहे . या कारणामुळे ही नेपाळची सर्वात महत्वाची नदी आहे .

5 ) संकोश :-

उगम :- उत्तर भूतान

ही नदी भूतान व भारत या देशांतून वाहते . उगम पावल्या नंतर ही नदी भारतात आल्या नंतर आसाम व पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा काही काळासाठी निश्चित करते .

6 ) तिस्ता :-

उगम :- तिस्ता कांगसे हिमनदी , सिक्कीम

ही नदी भारत व बांगलादेश या देशांतून वाहते .कांचनजंगा या पर्वताजवळ उगम पावल्या नंतर ही नदी सिक्कीम मधून वाहते . या नदीला सिक्कीम राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते . ही नदी काही काळ सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्याची सीमा बनवतेफुलचारी जिल्ह्यात जमुना नदीला मिळते .

आता आपण जाणून घेऊ ब्रह्मपुत्रा नदीला डाव्या बाजूने मिळणाऱ्या मुख्य उपनद्यांबद्दल .

जगातील सर्वात मोठा नदीवरील पूल हा ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. ज्याची लांबी 9.15किमी आहे .

7 ) दिबांग :-

उगम :- भारत- चीन सीमा , दिबांग व्हॅली जिल्हा ( अरुणाचल प्रदेश )

ही नदी या 3 नद्या मधील एक आहे ज्या मिळाल्या नंतर नदीला ब्रह्मपुत्रा असे नाव पडले . ही नदी सादिया शहराच्या जवळ आसाम मध्ये मिळते .

8 ) लोहित्य :-

उगम :- पूर्व तिबेट , ( तिबेट )

ही नदी भारत व तिबेट ( चीन ) या देशांतून वाहते . ही सुद्धा ब्रह्मपुत्रा तयार होण्यात ज्या तीन नद्या एकत्र येतात त्यातील एक आहे . सादिया शहराजवळ या नद्यांचा संगम होतो .

9 ) दिहिंग :- ( बुढी दिहिंग )

उगम :- पूर्वी हिमालय , ( अरुणाचल प्रदेश )

या नदीचे पात्र सुपारीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे . या भागात खूप मोठ्या प्रमाणात सुपारीचे उत्तपन्न होते . ही नदी देहिंगमुख , दिब्रूगढ जिल्ह्यात ब्रह्मपुत्रा नदीला मिळते .

10 ) दिखोऊ :-

उगम :- नागा टेकड्या , नागालँड

या नदीचा उगम नागालँड मध्ये होतो . ब्रम्हपुत्रा नदीच्या मुख्यतः सर्व उपनद्या छोट्या व डोंगराळ भागातून वाहतात . ही नदी नागालँड व आसाम या राज्यांतून वाहते .

11 ) धनसिरी :-

उगम :- लैसांग टेकड्या , नागालँड

ही नदी जगातील सर्वात जास्त वळण घेऊन वाहणाऱ्या नद्यांपैकी एक आहे . ही नदी छोटी परंतु खूप महत्वाची उपनदी आहे .

12 ) कोपीली :-

उगम :- बोरेल रांग , मेघालय

या नदीला पौराणिक महत्व प्राप्त झाले आहे . या नदीचे नाव कपिल ऋषींच्या नावावरून पडले आहे .ही नदी ब्रह्मपुत्रा नदीच्या एक विभाजक कलांग कालव्याला मिळते .

तरी या लेखात आपण जाणून घेतले ब्रह्मपुत्रा नदी व तिच्या मुख्य उपनद्या बद्दल . तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ते नक्की कंमेंट ( comment )मध्ये कळवा. पुढील लेखात आता आपण प्रायद्विपीय नद्यांबद्दल जाणून घेणार आहोत . तरी वाचत राहा STAY UPDATED …

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024