[ad_1]
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने आशिया चषक स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये विमानबंदीही आहे. त्यामुळे बाहेरच्या देशातून कोणतेही विमान किंवा प्रवासी आता श्रीलंकेत जाऊ शकत नाहीत. सातत्याने करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते. त्यामुळे जर जून महिन्यातील आशिया चषक रद्द होऊ शकतो तर जुलै महिन्यात भारताचा दौरा यशस्वीपणे कसा खेळवला जाऊ शकतो, असा सवाल आता विचारला जात आहे. त्यामुळे भारताचा श्रीलंकेचा दौरा सध्याच्या घडीला अडचणीत आला आहे.
आशिया चषक स्पर्धा गेल्यावर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही स्पर्धा खेळवणे संभव नसल्याचे सांगितले आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डीसिल्व्हा यांनी यावेळी सांगितले की, ” सध्याच्या घडीला करोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी आशिया चषक स्पर्धा खेळवणे योग्य ठरणार नाही. आता या स्पर्धेचे आयोजन २०२३ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकानंतर होऊ शकते. कारण यापुढील दोन वर्षे सर्व देशांचे कार्यक्रम व्यस्त आहेत.”
[ad_2]