आजच्या या काळात घरी बसून सगळेच खूप कंटाळले आहेत , याचे एक मुख्य कारण म्हणजे आपला बाहेरच्या चटकदार पदार्थांपासून आलेला दुरावा हे आहे . तर STAY UPDATED आपल्यासाठी घेऊन आले आहे विविध चटकदार पदार्थ घरी बनवण्याच्या पाककृती ( RECIPIES ) …. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत झणझणीत टोमॅटो सूप बनवण्याची पद्धत …
टोमॅटो फक्त भाजी किंवा सूपमध्ये खाल्ले असले तरी ते स्वादिष्ट वाटते. परंतु हे फक्त खायलाच मधुर नसून आपल्याला बर्याच आजारांपासून दूर ठेवते.
सुरवातीला आपण जाणून घेऊ टोमॅटो सूप बनवण्यासाठी लागणारी सामग्री काय आहे .
सामग्री ( MATERIAL ) :-
- लाल टोमॅटो – 5/6
- लसुन अदरक – 3/4 तुकडे
- मैदा – 50 ग्रॅम
- दूध – 50 ग्रॅम
- पाणी (मात्रा अनुसार)
- कांदा – 1/2
- काळी मिरची पावडर – 1/2टी स्पून
- कश्मिरी मिरची पावडर – 1/2टी स्पून
- इलायची – 2टी स्पून
- ब्रेडचे तुकडे – 2/4
- जीरा – 1/2टी स्पून
- दालचिनी – 1/2टी स्पून
- क्रीम – 2/3
- चवीनुसार मीठ
- तेज मसाला – 1/2 टी स्पून
- कोथंबीर
कृती ( ACTION ) :-
१) सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या. नंतर बारीक कापून एका बाउल मध्ये ठेवून द्या. त्यानंतर कोथिंबीर कांदा बारीक कापून घ्या. लसुन अद्रकाची पेस्ट तयार करा.
२) गॅस वर कुकर गरम करत ठेवा, त्यामध्ये थोडेसे तूप टाका तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये इलायची,काळी मिरी, लवंग, बेडकी मिरची, जिरा,कांदा, कापून ठेवलेले टोमॅटो, मात्रा अनुसार पानी घालून मिश्रण गॅसच्या मंद आचेवर साधारण 5 ते 10 मिनिटे टोमॅटो शिजेपर्यंत वाफवून घ्या.( आवश्यकतेनुसार पाणी घाला मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्या)
३) त्यानंतर मिश्रण थंड होऊ द्या,मिश्रण थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये वाटून घ्या. मिश्रणसूप गाळण्याच्या भांड्यातून गाळून घ्या. मात्रा अनुसार क्रीम घाला.
४) भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे घालून तडतडू दया. त्यात गाळलेले टोमॅटोचे मिश्रण घाला त्यात चवीनुसार मीठ घाला. हे मिश्रण उकळत ठेवा आणि जास्त आंबट वाटल्यास त्यात साखर घाला.
५) आता ब्रेडचे बारीक-बारीक चौकोर तुकडे करा, व तेलात हलके ब्राऊन करा.
६) टोमॅटो सूप ला कप मध्ये भरा दोन-तीन ब्राऊन केलेले ब्रेडचे तुकडे टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर वापरून सजवा आणी गरमागरम सर्व्ह करा.
थंडगार वातावरणात गरमागरम सूप प्यायाला खूप मजा येते, वातावरण अगदी थंडगार झालाय, त्यात हे गरमागरम टोमॅटो सूप आणखी मनाला आनंद देऊन जाईल.
टीप :-
१) टोमॅटो सूप चे मिश्रण पातळ झाल्यास मैदा आणि दूध टाकून सॉस तयार करा.(लक्षात असू द्या मैद्याचा रंग हलकासा ब्राऊन करा. ब्राऊनिंग सुगंध आल्यावर मात्रा अनुसार दूध घाला, व सॉस तयार करा.)
तरी या लेखात आपण जाणून घेतले चटकदार दहिवडा घरी बनवण्याची कला . आपल्याला दहिवडा बनवण्याची पाककृती कशी वाटली या बद्दल प्रतिक्रिया आम्हाला COMMENT मध्ये कळवा व अगदी असल्याचं नवनवीन पाककृती जाणून घेण्यासाठी वाचत रहा फक्त STAY UPDATED …