Saturday, February 4, 2023

शिवचरित्र भाग – 2 ( इतिहास भोसले घराण्याचा )

नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र पाहिला . या मध्ये संतांचे कार्य , लोकांचे निजामशाही व आदिलशाही असल्या सत्ताधारी वर्गामुळे होणारे हाल या बद्दल पाहिले . तरी या लेखात आपण भोसले घराण्याच्या इतिहासाबद्दलमराठा सरदारांनबद्दल पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .

मराठा सरदार :-

मराठे सरदार काटक , शूर , धाडसीस्वाभिमानी होते . मोठ्या मोठ्या लढायांमध्ये पराक्रम गाजवण्यात त्यांना गर्व वाटे . त्या काळात मराठा सरदार फौजबंद असत . कोणताही फौजबंद सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला चाकरीत ठेवी . त्यांना सरदारकी किंवा जहागिरी देई . जहागीर दिल्यावर सरदार स्वतःला त्या भागाचा छोटा राजाच समजत असे . विजापूरचा आदिलशाहीअहमदनगरची निजामशाही यांमध्ये अनेक मराठा सरदार होते . उदाहरण म्हणजे

   सिंधखेडचे जाधव
   फलटणचे निंबाळकर
   मुधोलचे घोरपडे
   जावळीचे मोरे
   वेरुळचे भोसले

- Advertisement -

हे सारे सरदार शूर होते . परंतु त्यातील बऱ्याच सरदारचे आपापसांत वैर होते . स्वकीयांसाठी एकत्र येऊन काही तरी करावे ही दृष्टी त्यांना नव्हती . त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी जुलमी सत्तांच्या उपयोगी पडत असे . असे असले तरी त्या काळी महाराष्ट्रत अनेक वीर निर्माण झाले , त्यांनी शौर्याची परंपरा चालू ठेवली . पुढे याच वीर लोकांचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यात उपयोग केला .

वेरूळचे भोसले घराणे :-

वेरुळचे पाटील बाबाजीराजे भोसले हे होते . त्यांना 2 मुले होते त्यातील मोठे मालोजीराजे व धाकटे विठोजीराजे हे होते . मालोजीराजे मोठे शिवभक्त होते , सोबतच अत्यंत पराक्रमी होते . त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते . निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या बोलण्यावरून मालोजीना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी मिळाली . या वरून भोसल्यांच्या घरी वैभव आले . मालोजीराजे यांच्या पत्नी फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या होत्या . त्यांना 2 मुले होते शहाजीशरीफजी . शहाजी लहान असताना मालोजीचा लढाईत मृत्यू झाला . विठोजीराजे यांनी शहाजींचे पालन पोषण केलं .

शहाजी कर्तबगारशूर निघाले . त्यांना मालोजींच्या पुणे-सुपे जहागिरी मिळाल्या . लखुजी जाधव यांची कन्या म्हणजेच जिजाबाई यांच्याशी शहजीराजे यांचा विवाह झाला . निजामशाही दरबारात जाधवांचा दबदबा होता . शूर व पराक्रमी सरदार म्हणून लखुजी जाधव यांची ओळख होती . याच जिजाबाईंच्या पोटी शिवजीराज्यांचा जन्म झाला  ते आपण पुढे पाहणारच आहोत .

शहाजीराजे भोसले :-

 

शिवाजी महाराज व शहजीराजे यांच्या भेटीचा क्षण ..

मालोजींची जहागिरी शहाजी राजे यांना मिळाली . परंतु निजामशाही दरबारात त्यानीं स्वतःहची ओळख आपल्या पराक्रमशौर्यावर निर्माण केली . ते निजामशाही दरबारातील अत्त्यांत शूर सरदार म्हणून उदयाला आले . जेंव्हा मुघल बादशहाने निजामशाही जिंकून घेण्यासाठी प्रयत्न केले तेंव्हा विजापूरचा आदिलशाह त्याला जाऊन मिळाला . परंतु मलिक अंबर व शहाजीराजे यांनी मिळून अहमदनगर जवळील भातवडी येथे या दोन्ही फौजांचा पराभव केला . या लढाईत त्यांचे छोटे बंधू शरीफजी मारले गेले परंतु शहजींच्या पराक्रम व युद्धकौशल्यामुळे निजामशाही दरबारात त्यांचा दबदबा निर्माण झाला . नंतर हा इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की मलिक अंबर व शहाजी यांमध्ये खटके उडू लागले . या कारणामुळे शहाजीराज्यानी निजामशाही सोडली . निजामशाही सोडल्यानंतर शहाजी राजे आदिलशाहीला जाऊन मिळाले . आदिलशहा शहाजीराजांच्या कर्तृत्वला चांगला ओळखुन होता म्हणून त्याने त्यांना लगेच आपल्या दरबारात जहागीर दिली सोबत “सरलष्कर” ही मानाची पदवी बहाल केली .

या घटने नंतर काही काळानंतर मलिक अंबर याचा मृत्यू झाला व निजामशाहीला उतरती कळा लागली . मलिक अंबरचा मुलगा फत्तेखान हा त्या नंतर वजीर झाला परंतु तो निजामशाही सांभाळू शकला नाही . याचं कारणामुळे निजामशहाची आईने शहाजीना परत येण्याचे साकडे घातले . शहाजी राजे परत आले व या कारणांमुळे निजामशाही पतन होण्याची प्रक्रिया काही काळ मंदावली परंतु मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त शक्तीपूढे निजामशाहीचे लगेच पतन झाले आणि या पतानाला नंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा काही प्रमाणात शिवरायांना योग्य फायदा घेतला .

पुढील लेखात आपण शिवजन्म , त्यांचे बालपण   पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत ….

[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]

आमच्यासोबत कनेक्ट राहा.

0FansLike
3,692FollowersFollow
0SubscribersSubscribe

निवडक अपडेट्स

Home
Test Series
Videos
Notifications
Offers