ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

राज्य कायदेमंडळातील ‛विधानपरिषद’

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

नमस्कार , वाचक मित्रांनो मागील लेखात आपण जाणून घेतले विधानसभेबद्दल . आपण तो लेख वाचलाच असेल. या लेखात आपण जाणून घेणार आहोत विधानपरिषदेबद्दल ..

विधानपरिषद हे घटक राज्याचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे.राष्ट्रपतीची निवडणूक, घटना दुरुस्तीचे विधेयक यामध्ये विधान परिषदेस स्थान असते.सर्वाधिक विधानपरिषद सदस्य क्षमता असलेली राज्ये उत्तर प्रदेश (१००), महाराष्ट्र (७८),बिहार (७५) व आंध्र प्रदेश (५८) हे आहेत.महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत.

रचना (कलम १७१) :-

१९५६ च्या ७ व्या घटनादुरुस्तीनुसार, विधान परिषदेचे सदस्य संख्या तेथील विधानसभा सदस्य संख्येच्या १/३ पेक्षा जास्त नसावी किंवा ४० पेक्षा कमी नसावी असे ठरविण्यात आले आहे.(कमीत कमी ४० व जास्तीत जास्त विधानसभा सदस्य संख्येच्या १/३)

- Advertisement -

अपवाद:जम्मू-काश्मीर विधान परिषदेत सदस्यांच्या विशेष काही यांनी ३६ सदस्य निर्धारित केले आहेत

कलम १७१:-  विधान परिषदेच्या एकूण सदस्यांची नेमणूक खालीलप्रमाणे होते.

 1. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून:- महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधून एक तृतीयांश सदस्य (१/३) निवडले जातात. त्यांची संख्या २२ असते.
 2. विधानसभा मतदारसंघातून:- एकतृतीयांश सदस्य(१/३) निवडले जातात, जे स्वतः विधानसभा सदस्य नाहीत असे 30 सदस्य.
 3. पदवीधर मतदारसंघातून:- पदवी म्हणून तीन वर्षात झालेल्या व संबंधित राज्यात राहणार या मतदारसंघातून एक बारांश (१/१२) सदस्यांची निवड केली जाते, त्यांची संख्या ७ असते.
 4. शिक्षक मतदारसंघातून:- कमीतकमी तीन वर्ष माध्यमिक, कॉलेज, व महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सदस्यांमधून (१/१२) सदस्यांची निवड केली जाते, त्यांची संख्या ७ असते.
महाराष्ट्र विधान भवन ( मुंबई )

सदस्यत्त्वासाठी पात्रता :-

 • भारताचा नागरिक असावा .
 • वयाची ३० वर्षे पूर्ण झालेली असावी.
 • संसदेच्या वेळेच्या अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

निवडणूक पद्धती :-

अप्रत्यक्ष प्रमाणशीर प्रतिनिधित्व एकल संक्रमण पद्धतीनुसार निवडणूक होते. निवडून येण्यास आवश्यक कोटा पूर्ण करणाऱ्या उमेदवारास विधान परिषद सदस्य म्हणून नेमले जाते.

कार्यकाल :-

राज्यसभेचे प्रमाणे विधानपरिषद हे देखील स्थायी सभागृह आहे.दर दोन वर्षांनी विधानपरिषदेचे १/३ सदस्य निवृत्त होतात व त्या जागी तितकेच पुन्हा निवडले जातात. सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो.

विधानपरिषद सदस्यांना राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ (कलम १८८) :-

विधानपरिषदेच्या परवानगीशिवाय सतत व सलग ६० दिवसांच्या काळात होणाऱ्या विधान परिषदेच्या बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. हा ६० दिवसांचा कालावधी मोजताना या काळात सभागृहाचे अधिवेशन संपले असेल किंवा लागोपाठ चार दिवसांनी अधिक काळ तेथे खूप असेल असा कालावधी यात प्रामुख्याने मोजला जात नाही.

विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती (कलम१६९ ) :-

एखाद्या राज्याच्या विधानसभेचे एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या २/३ बहुमताने ठराव संमत केल्यास, संसद कायद्याद्वारे त्या राज्यात विधानसभा निर्माण करील अथवा नाहीशी करील.भारतातील बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि तेलंगणा या सात राज्यांमध्ये विधानपरिषद (विधानसभेसह) अस्तित्वात आहेत.(१९८५ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यातील बरखास्त केलेली विधानपरिषद ३० मार्च २००७ पासून पुन्हा अस्तित्वात आली आहे.)

सभापती व उपसभापती:-

कार्यकाल प्रामुख्याने पाच वर्षांचा असतो. विधान परिषदेचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती म्हणून व दुसऱ्या सदस्याची उपसभापती म्हणून निवड करतात. सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती त्यांचे काम पाहतात.

विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांचे पद रिक्त होणे (कलम १८३):-

पुढील परिस्थितीत सभापती उपसभापती यांचे पद रिक्त होऊ शकते.

 • विधान परिषदेचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास .
 • त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यास .
 • प्रमोशन ( पदउन्नती )
 • पदच्युती

राजीनामा :-

विधान परिषदेचे सभापती आपल्या पदाचा राजीनामा उपसभापतीकडे देतात.विधानपरिषदेचे उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा सभापती कडे देतात.

पदच्युती (कलम१८३) :-

विधान परिषदेच्या सभापती व उपसभापती यांना मुदतीआधी पदावरून दूर करायचे असल्यास विधान परिषदेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांना बहुमताने ठराव संमत व्हावा लागतो.मात्र या, आशयाची नोटीस किमान १४ दिवस आधी संबंधितांना देणे गरजेचे असते.

घटना दुरुस्ती बाबत राज्य विधिमंडळाचा अधिकार (कलम३६८):-

काही घटनादुरुस्तीसाठी संसदेच्या विशेष बहुमतासह निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या संमतीची गरज असते.या वेळेस विधान परिषदेचे महत्त्व खूप जास्त असते .

तरी वरील लेखात आपण जाणून घेतले विधानपरिषदविधानपरिषदेच्या काही वैशिष्ट्यपूर्ण हक्क .पुढील लेखात आपण जाणून घेणार आहोत राज्यपालबद्दल . तुम्हाला हा लेख कसा वाटला या बद्दल प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा व अधिक माहिती साठी वाचत रहा STAY UPDATED …

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024