जून महिन्यात श्रीलंकेत आशिया चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पण सध्याच्या घडीला करोनामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीही करोनामुळे आशियाच चषक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती. पण त्यानंतर या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले होते. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही स्पर्धा खेळवणे संभव नसल्याचे सांगितले आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी अॅश्ले डीसिल्व्हा यांनी यावेळी सांगितले की, ” सध्याच्या घडीला करोनामुळे भयावह स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यावर्षी आशिया चषक स्पर्धा खेळवणे योग्य ठरणार नाही. आता या स्पर्धेचे आयोजन २०२३ साली होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकानंतर होऊ शकते. कारण यापुढील दोन वर्षे सर्व देशांचे कार्यक्रम व्यस्त आहेत. ही स्पर्धा यावर्षी रद्द करण्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल.”
[ad_2]
आशियाई देशांमध्ये करोनामुळे सध्या विमानबंदी आहे. त्याचबरोबर श्रीलंकेने आता १० दिवस विमानबंदीचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला श्रीलंकेचा संघ हा बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.