ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

ऑक्सिजन देणारी १० झाडं, जे घराचं सौंदर्य वाढविण्याबरोबर, तुम्हाला आजारापासूनही दूर ठेवतील

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

ही झाडं तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय दररोज ऑक्सिजन पुरवठा करत राहतील.

भारताबरोबर जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनी हाहाकार घातला. कोरोनाने लोकांचं जगणं मुशकिल केलं. भारतात जेव्हा दुसरी लाट आली, तेव्हा ऑक्सिजनच्या कमतेरतेमुळे हाहाकार माजला होता. अनेक लोकांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. या काळात अनेक निसर्गप्रेमी आणि डॅाक्टर देखील झाडाचं महत्त्व सांगून एकतरी झाडं लावा असं आवाहन करत होते. (10 oxygen-rich trees which enhance the beauty of the house and keep it away from diseases)

तुम्हाला देखील झाडं लावायची आहेत, परंतु जागेअभावी तुम्हाला झाडं लावणं शक्य नसेल तर आम्ही तुम्हाला अशी काही झाडं सांगणार आहोत जी, तुम्ही घरात लावूनही ऑक्सिजन मिळवू शकता. जी झाडं दररोज तुम्हाला ऑक्सिजन देत राहतील, ते देखील कमी खर्चात. पाहूयात ही झाडं, रोपं…

- Advertisement -

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने ही झाडं लावायची पद्धत सुचवली आहे. काही दिवसांपूर्वीच नासाने या १० झाडांबद्दल सांगितलं आहे की, जे तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. ही झाडं तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय दररोज ऑक्सिजन पुरवठा करत राहतील.

१) मनी प्लांट

मनी प्लांट हे अशी वनस्पती आहे. जी खूप कमी जागेत आणि कमी सूर्यप्रकाशात देखील ऑक्सिजन तयार करते. नासाच्या म्हणण्यानुसार मनी प्लांट बेनजेन , फॅार्मेल्डिहाइड ,जाइलीन, टोलुइन आणि ट्राईक्लोरोएथिलीन असे धोकादायक गॅस शोषून घेते.

परंतु मनी प्लांटला लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांपासून लांब ठेवायला हवं, चुकूनही लहान मुलं किंवा पाळीव प्राणी यांनी झाडाची पानं खाल्ली तर उलट्या होणे, तोंडावर आणि जिभेवर सूज येणे,अशा प्रकारे तक्रारी येऊ शकतात.

मनी प्लांटला तुम्ही सात दिवसातून एकदा पाणी दिलं तरी देखील ते पुरेसे आहे. तुम्ही मनी प्लांटला कोणत्याही खोलीत ठेऊ शकता. परंतु लहान मुलांपासून आणि पाळीव प्राण्सापासून हे झाड लाबं ठेवणे गरजेचं आहे.

२) स्नेक प्लांट

स्नेक प्लांटचे खास वैशिष्ट म्हणजे हे झाड रात्रीसुद्धा ॲाक्सिजनची निर्मिती करतं. त्याचबरोबर हे झाड बेनजेन, फॅार्मेल्डिहाइड, ट्राईक्लोरोएथिलीन, ट्रिक्लोरो, जाइलीन, टोलुइनसारख्या विषारी गॅसपासून संरक्षण करतं. हे झाड तुम्ही हॅाल,बेडरूममध्ये ठेऊ शकता.

खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशातून सुद्धा हे झाड उगू शकतो. विशेष म्हणजे या झाडाला आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे लागते.

३) एरेका पाम

सर्व झाडांपेक्षा एरेका पाम असं झाड आहे की ,जे वातावरणातून कार्बन डायॉऑक्साइड घेतो, आणि ऑक्सिजन सोडतो. हे झाड आजूबाजूच्या हवेतून असलेल्या विषारी फॅार्मेल्डिहाइड, जाइलीन,आणि टोलुइन यांना शोषून घेतो. या झाडाची वैशिष्ट्य म्हणजे कमी सूर्यप्रकाशात आणि कमी पाण्यात उगतो. या झाडाला तुम्ही बैठकीच्या रूममध्ये ठेऊ शकता.

४ ) गरबेरा डेजी

गरबेरा डेजीला खूप सुंदर झाड म्हणून ओळखलं जातं. या झाडाचं खूप लोक घर सजावटीसाठी देखील वापर करतात. या झाडाला सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते.त्यामुळे हे झाड अशा ठिकाणी ठेवलं पाहिजे की जिथे ब-यापैकी सूर्यप्रकाश मिळेल, तसेच याला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. याला तुम्ही बेडरूम किंवा हॅालच्या खिडकीत ठेऊ शकता.

५) चायनीज एवरग्रीन

चायनीज एवरग्रीन हे झाड तुम्हाला अनेकाच्या घरात दिसून येईल. हळूहळू वाढणारं हे झाड १८ ते २७ अंश सेल्सिअस तापमानात चांगल्या प्रकारे वाढतं. या झाडांची उंची ३ फुटापर्यंत असते. मोठ्या, मोठ्या पानाचं हे झाड वातावरणातून बेनजेन आणि फॅार्मेल्डिहाइडला शोषून घेतं. याला रोज पाणी देण्याचीही गरज नाही.

पाळीव प्राण्यांसाठी हे धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे त्यांना या झाडापासून लांब ठेवाने गरजेचं आहे.या झाडाला तुम्ही हॅालमध्ये ठेऊ शकता.

६ ) ड्रॅगन झाड

ड्रॅगन झाड हे नेहमी हिरवंगार राहणार झाड आहे. या झाडाला सूर्यप्रकाशाची गरज असते, त्यामुळे या झाडाला तुम्ही जिथे सूर्यप्रकाश येऊ शकतो तिथे ठेऊ शकता. या झाडाला पाणी तुम्ही माती भिजेल त्या अंदाजाने देऊ शकतात. तुम्ही या झाडाला बाल्कनीत किंवा हॅालमध्ये अशा ठिकाणी ठेऊ शकता जिथे ऊन येतं.

७) वीपिंग फिग

वीपिंग फिग हे झाड महाराणी विक्टोरिया यांच्या काळापासून अनेकांच्या आवडीचं झाड आहे. हे झाड २० मीटरपर्यंत उंच वाढतं. याला त्याच्या शेंड्यातूनच फाद्या येऊ लागतात. जेव्हा हे झाड लटकतं, लटकत खाली जमीनीपर्यंत पोहोचलं जात.तेव्हा ते स्वःताच एक नवीन खोड बनवतं. याची पाने खाली लटकताना असे दिसतात की डोळ्यातून पाणी टपकत आहे.

यामुळेच याला वीपिंग झाड हे नाव दिलं गेलं आहे. या झाडाचे मुळं जमीनीत किंवा फुलदाणीत चांगल्या प्रकारे वाढू शकतात. या झाडांमुळे पाळीव प्राण्यांना त्रास होऊ शकतो. हे झाड हिवाळयात काही कारणाने कोरडं होऊ शकतो.

८) स्पाइडर प्लांट

स्पाइडर प्लांटला रिबन प्लांट या नावने देखील ओळखलं जातं. या झाडाची उंची २ फुटापर्यंत असते. हे झाड २ डिग्री तापमानात देखील चांगल्या प्रकारे वाढू शकतो. या झाडाला आठवड्यातून एकदाच पाणी देण्याची गरज असते.परंतु या गोष्टीच देखील काळजी घ्या की माती ओलसर असेल तर एक किंवा दोन दिवसांनंतरच पाणी द्या. आपण या झाडाला हॅालमध्ये किंवा बेडरूममध्ये ठेऊ शकता.

९) ब्रॅाड लेडी पाम

या झाडाला बांबू पाम नावाने देखील ओळखलं जातं. हे झाड स्वच्छता उत्पादनांमधील अमोनिया शोषूण घेतो. तसेच वातावरणातील बेनजेन ,फॅार्मेल्डिहाइड, जाइलीन, आणि ट्राइक्लोरोएथिलीन यांना कमी करतो. हे हवेला तर स्वच्छ ठेवतोच त्याच बरोबर ऑक्सिजनची पातळी देखील वाढवतो.

हे झाड ४ मीटरपर्यंत वाढतं.उन्हात याचा रंग पिवळसर पडतो. त्यामुळे याला अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी सावली असेल. गर्मीमध्ये याला पाणी देणं गरजेचं आहे. त्या शिवाय याला रोज पाणी देण आवश्यक आहे.

१०) कोरफड ( एलोवेरा )

कोरफड (एलोवेरा ) हे अशी वनस्पती आहे, जी तुम्हाला अनेकांच्या गॅलरीत ,गच्चीवर , बागेत पाहायला मिळेल. कोरफडीपासून निघणारं जेल फक्त किचनमध्येच नाही तर सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

आयुर्वेदामध्ये यांचे अनेक औषधी फायदे सांगितले आहेत. कोरफड उष्ण वातावरणातही चांगल्या प्रकारे वाढते. शिवाय जास्त पाणी देण्याची गरज भासत नाही. कोरफडीला तुम्ही घराच्या कोणत्याही कोप-यात ठेवू शकता.

वरील सर्व झाड घरी लावले तर नक्कीच मोठ्या प्रमाणात घरीच ऑक्सिजन मिळवू शकता .आणि या झाड्याच्या मदतीने घर देखील सुंदर ठेऊ शकता.

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024