ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल ?

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

भारतातील कोरोना लशीच्या तुटवडा पाहता एकाच व्यक्तींवर दोन वेगवेगळ्या लशी (Mixing Vaccines) वापरणं किती योग्य ठरेल?

कोरोना प्रतिबंधक लशींचा (Corona Vaccine) तुटवडा भारतात तर जाणवतोच आहे. पण तो जगभरात अनेक देशांमध्येही आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लशींचे डोसेस देऊन या तुटवड्यावर मात करता येईल का, यादृष्टीने विचार सुरू झाला आहे. पण पहिला डोस एका कंपनीच्या लशीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीच्या लशीचा (Mixing of Vaccines) अशा पद्धतीने डोस घेतले तर त्याचा काही परिणाम होतो का? असा प्रश्न साहजिकच पडतो.

दोन वेगवेगळ्या लशींचे डोस घेतल्यावर कोणती लक्षणे आढळून येतात ?

ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या (Oxford University) संशोधकांनी हा प्रयोग केला. ज्याचा निष्कर्ष लँसेट (Lancet) या मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोना लशीचेे दोन वेगवेगळे डोस घेणाऱ्या व्यक्तींना थकवा, डोकेदुखी असे साइड-इफेक्ट्स जाणवतात, असं संशोधनातून लक्षात आलं आहे. ब्लूमबर्गने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

प्रयोगादरम्यान काही व्यक्तींना अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीचा पहिला डोस देण्यात आला, तर चार आठवड्यांनंतर दुसऱ्या डोसवेळी त्यांना फायझर कंपनीची लस देण्यात आली. या व्यक्तींना थोड्या कालावधीसाठी सौम्य स्वरूपाचे साइड-इफेक्ट्स (Side Effects) जाणवले. या लशींचा क्रम उलटा केला, तरी तसेच साइड-इफेक्ट्स जाणवल्याचं संशोधकांनी नमूद केलं आहे.

- Advertisement -

ऑक्सफर्ड विद्यापीठातले लसीकरण या विषयातले प्राध्यापक मॅथ्यू स्नेप यांनी सांगितलं, ‘आम्हाला या प्रयोगातून अपेक्षित असलेले निष्कर्ष मिळालेले नाहीत. दोन डोस वेगवेगळ्या लशींचे दिल्यास प्रतिकारशक्ती विकसित होण्यास हातभार लागेल का, याबद्दल आम्हाला अद्याप माहिती नाही. आणखी काही आठवड्यांत आम्ही निष्कर्ष काढू.’

फ्रान्समध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनीची लस आता केवळ ज्येष्ठांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. मात्र सरकारने तसा नियम करण्यापूर्वी अनेकांनी ती लस घेतली होती. त्या व्यक्तींना आता फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशी दुसऱ्या डोससाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

भारतात केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरच्या सर्वांनाच लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र लसीकरण कार्यक्रमाचा (Vaccination Drive) वेग जवळपास 50 टक्क्यांनी घटल्याचं सरकारी आकडेवारीवरून दिसून येत आहे.

को-विन प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, एक मे ते सहा मे या कालावधीत 11.6 दशलक्ष डोस दिले गेले. तीन एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत 24.7 दशलक्ष डोस दिले गेले होते. गेल्या आठ आठवड्यांच्या तुलनेत गेल्या आठवड्यात देण्यात आलेल्या डोसची संख्या सर्वांत कमी आहे. त्यामुळे एक मेनंतर 18 वर्षांवरच्या सर्वांना लसीकरणाच्या कक्षेत आणण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp