हि पोस्ट खरी त्या बांधवासाठी जे आपल्या आर्थिक परिस्थितीशी लढत आपले शिक्षण पूर्ण करू पाहताहेत. बऱ्याचवेळा बरेच विद्यार्थी विविध बँकामध्ये शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी फेऱ्या मारत असतात. अशावेळी त्या विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्जाबद्दल सर्व माहिती असणे आवश्यक आहे. (What is educational loan in Marathi ) education loan eligibility.
शैक्षणिक कर्ज (Educational Loan) म्हणजे काय ?
शैक्षणिक कर्ज म्हणजे बारावीनंतरच्या पदवी किंवा पदव्युत्तर तसंच उच्च शिक्षणासाठी बँकाकडून व्याजाने घेतली जाणारी रक्कम. उच्च शिक्षणाच्या शुल्काव्यतिरिक्त खर्चासाठीही (शैक्षणिक खर्च (Educational Expenses)) ही कर्ज मिळू शकतं. शैक्षणिक कर्ज सरकारी तसंच खाजगी बँकाही उपलब्ध करुन देतात. ex. sbi education loan, hdfc education loan, canara bank education loan
शैक्षणिक कर्जाचा ईएमआयआय (EMI – मासिक परतफेड हफ्ता) म्हणजे काय ?
कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची निश्चित व्याजासह पूर्ण परतफेड होईपर्यंत दरमहा समान हफ्त्यामध्ये वसूल केली जाणारी रक्कम म्हणजे ईएमआय (EMI – Equated Monthly Installments). दरमहा आकारल्या जाणाऱ्या ईएमआयमध्ये व्याज(interest) आणि मुद्दल रक्कम(Principal Amount) यांचा समावेश असतो. ईएमआयचा म्हणजेच मासिक परतफेडीचा विचार केल्याशिवाय कर्जाची रक्कम आणि परतफेडीची मुदत निश्चित होत नाही. शैक्षणिक कर्जाची मर्यादा ही बँकनिहाय वेगवेगळी असू शकते. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाची परतफेड हे ज्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं आहे ते पूर्ण झाल्यावर किंवा त्या शिक्षणावर आधारीत नोकरी लागल्यावर होते. याबाबतही वेगवेगळ्या बँकाचे वेगवेगळे नियम आहेत.
शैक्षणिक कर्जाच्या ईएमआयची निश्चिती/आकारणी कशी होते ?
शैक्षणिक कर्जामुळे देशात किंवा देशाबाहेर उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत होते. आपली उद्दीष्टपूर्ती झाल्यानंतर या कर्जाची परतफेड करण्यासाठी ईएमआय निश्चित केला जातो. शैक्षणिक कर्ज कॅल्क्युलेटरच्या (education loan emi calculator) मदतीने तुम्ही हा ईएमआय किती असेल हे पाहू शकता.
शैक्षणिक ईएमआय कॅल्क्युलेटर कसं मदत करु शकतं ?
आपण घेत असलेल्या कर्जाचा मासिक हफ्ता किती असेल याची आधीच कल्पना असेल तर आपल्याला आर्थिक नियोजन करणं सोपं जातं. आपल्या दरमहा मिळकतीतून किती रक्कम कर्ज परतफेडीसाठी बाजूला काढून ठेवायची आहे, याची आधीच कल्पना येते. यामुळे तुम्ही कर्ज आणि त्यावरील व्याज (education loan interest) तसंच कर्जाची शिल्लक राहिलेली रक्कम याचाही आढावा घेऊ शकता. कर्जाच्या ईएमआयची आगावू माहिती असणं चांगल्या आर्थिक शिस्तीचं लक्षण आहे. (नक्की वाचा : Education Loanसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्र महत्वाची, जाणून घ्या! )
कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटरचे फायदे –
- आपली कर्ज घेण्याची क्षमता समजते
- किती मुदतीसाठी किती कर्ज घेऊ शकतो, याचं नियोजन करता येतं
- कर्जाच्या परतफेडीचं निश्चित नियोजन करता येतं
- गरजेनुसार मुदतपूर्व कर्ज परतफेड कधी करायची ते ठरवू शकतो.
शैक्षणिक कर्जाचे फायदे –
शैक्षणिक कर्जाचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही
- शैक्षणिक कर्जामुळे संबंधित अभ्यासक्रमाचं शैक्षणिक शुल्क, हॉस्टेल आणि वह्या-पुस्तकांचा खर्च भागवला जातो.
- सर्वसाधारणपणे एकूण शैक्षणिक खर्चाच्या 90 टक्के पर्यंत कर्ज बँका देतात.
- दिलेल्या व्याजावर प्राप्तिकरात वजावट मिळू शकते.
- अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर कर्जाची परतफेड सुरु होते.
- शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी लागेपर्यंत काही बँका मोरॅटोरियम कालावधी देतात, त्यामुळे आपल्याला कर्ज परतफेडीसाठीचं योग्य नियोजन करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो.
नियमित कर्ज परतफेड तुमची कर्जाची पत वाढवण्यासाठी महत्वाची असते, त्यामुळे भविष्यातील अन्य कर्ज घेण्यासाठी तुमची पत सुधारते.
शिक्षण कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर >> क्लिक करा
Credit. ABP Live