नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील लेखात आपण भोसले घराण्याचा सविस्तर इतिहास पहिला. तरी या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयावर पाहणार आहेत. तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .
जेंव्हा मुगल व आदिलशाही मिळून निजामशाहीला मिटवण्यासाठी निघाले होते त्याच काळात जिजाबाई गरोदर होत्या. निजामशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणून शहाजीकडे पाहिले जात होतं. या काळात पत्नीला सुरक्षित करून आपल्या कामगिरीवर जाण्याचे शहाजीनी ठरवलं. परंतु सुरक्षित असे ठिकाण पुणे सुभ्यात कोणते ? तर शिवनेरी किल्याचे नाव समोर आले. असल्या परिस्थिती जिजाबाईना शिवनेरी किल्यावर ठेवून शहाजी आपल्या मोहिमेवर गेले.
किल्ले शिवनेरी :-
शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला .सध्या शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून हा किल्ला ओळखला जातो . त्याच्या सर्व बाजूंनी बळकट दरवाजे , उंच कडे व भक्कम तटबंदी होती . किल्ला प्रचंड मजबूत होता. विजयराज हे या किल्याचे किल्लेदार होते .
शिवजन्म :-
फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाबाईच्या पोटी लहानश्या मुलाचा जन्म झाला . गडावर शिवाई देवीचे मंदिर , किल्ला शिवनेरी यामुळे मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले . मनुष्य कसा देवत्वाची प्राप्ती करू शकतो याचे उदाहरण याच शिवाजीने लोकांपुढे ठेवले .
‛ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणी प्रमाणे शिवाजीच्या मनात लहानपणी पासून आई जिजाबाई यांनी आदर , सद्बुद्धी , विरता , चातुर्य निर्माण केले . जिजाबाई त्यांना रामायणात , महाभारतच्या गोष्टी सांगत . ज्ञानेश्वर , नामदेव , एकनाथ महाराजांचे अभंग व कीर्तन सांगत . लहानपणापासून शिवाजीने सर्व लोकांना समान वागणूक दिली , जातीपातीच्या बंधनात न अडकता सर्वांना सोबत घेऊन राहिले . लहानपणी सर्वांच्या घरी जात , मावळ्यांसोबत राहत .
शहाजीराजे यांचे निजामशाही वाचवण्याचे प्रयत्न :-
निजामशहाच्या आईच्या म्हणण्यानुसार शहाजीराजे निजामशाही दरबारात परत तर आले परंतु आता परिस्थिती बदलली होती . दरबारात कारस्थान वाढले होते . याचाच परिणाम म्हणजे लखोजी जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली . या कारणाने चिडी गेलेल्या शहाजीनी निजामशाही सोडून मुघलांच्या दरबारी गेले .
वजीर फत्तेखान याने कट करून मुघलांच्या हातून संपूर्ण निजामशाही नष्ट केली . या बदल्यात शहाजींचे पुण्याचे वतन त्याला देण्यात आले . याचा संताप म्हणून शहाजी मुघलांच्या दरबारातून बाहेत पडले . निजामशहाचा वंशज सापडून त्याला पेमगिरी येथे नवीन निजामशहा म्हणून जाहीर केले . गोदावरी व नीरा नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश काबीज केला . या प्रदेशाच्या संरक्षण करण्याच्या हेतूने गनिमी काव्याने लढत होते . परंतु मुघल , अदिलशाहा यांचा मैत्रीमुळे त्यांची शक्ती अपुरी पडू लागली . त्यामुळे त्यांनी 1636 मध्ये मुघलांच्या सोबत करार केला .
या काळात जिजाबाई व शिवजी यांची अत्यंत धावपळ झाली . शहाजीना शिवाजी सोबत वेळ घालवण्यास मिळला नाही . परंतु जिजाबाई यांनी या काळातही त्यांच्यावर उत्तम संस्कार दिले . शहाजी यांचे राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न फसले . परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश शिवाजीच्या स्वरूपात आले कारण त्यांच्या या प्रयत्नांचा लोकांच्या मनात आपले राज्य निर्माण करण्याचा विचार आला व याचा उपयोग काही प्रमाणात शिवाजी महाराज यांना झाला .
ध्येय कर्नाटक :-
आदिलशाह व मुघल यांनी मिळून शहाजींचे निजामशाही राज्य बुडवले व तो प्रदेश आपापसात वाटून घेतला . पुणे प्रदेश आदिलशाही भागात आला . आता शहाजी परत आदिलशाही दरबारात आले त्यांना पुण्याचा प्रदेश मिळाला परंतु आदिलशाह ने त्यांची नेमणूक कर्नाटक प्रांत जिंकून घेण्यासाठी केली . शहाजीराजे कर्नाटकात आले तेथ त्यांनी अनेक प्रांत जिंकून घेतले . यामुळे त्यांना बंगळूर प्रांत बक्षीस म्हणून मिळला . आता शहाजीराजे तेथेच छोट्या राजसारखे राहू लागले व बंगळूरला आपले मुख्य ठाणे केले . या ठिकाणी नंतर त्यांनी जिजाबाई व शिवाजींना बोलवून घेतले . या ठिकाणी त्यांना खूप वर्षांनंतर आराम मिळला .
पुढील लेखात आपण शिवाजीचे सुरवातीचे शिक्षण व पुण्यात पुनरागमन पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …
[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]