शिवकालीन किल्ले -एक प्रवास इतिहासाकडे या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे. मागील लेखात आपण महाराष्ट्रातील काही किल्यांविषयी जाणून घेतले. या लेखात आपण पुढील काही किल्यांविषयी जाणून घेऊ. शिवरायांचा इतिहास अजरामर आहे आणि तो अजरामरच राहील.
इतिहास म्हटले कि, सर्वात अगोदर शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर येतो. नक्कीच तुमच्यासोबतही असेच घडत असेल. आणि शिवरायांचा हा इतिहास भक्कम व मजबूत करण्यासाठी शिवरायांना किल्ल्याची खूप साथ लाभली.
महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच किल्ल्याची मदत घेऊन राजे शिवछत्रपती यांनी मुघलांविरुद्ध भक्कम असल्या मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. या लेखात आपण महाराष्ट्रामधील महत्वाच्या किल्ल्यांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे.