ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

डबल मास्क घालण्याची योग्य पद्धत कोणती? काय कराल, काय टाळाल? जाणून घ्या…

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

कोविड-19 लसीचे (Covid-19 Vaccine)  दोन्ही डोस घेतल्यानंतरही मास्क (Mask) घालणे आणि सोशल डिस्टसिंगचे (Social Distancing) पालन करणे अत्यावश्यक आहे. दिल्ली स्थित ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणतात, “पूर्णपणे लसीकरण केले तरी मास्क लावणे बंद करु नका. हा विषाणू सतत बदलत असतो आणि विषाणूच्या निरंतर बदलत्या स्वरूपात आपली लस किती प्रभावी ठरते याबद्दल अनिश्चितता आहे.”

कोरोना व्हायरसच्या नव्या वेरिएंटमुळे घरात देखील मास्क घालण्यास सुरुवात करा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हि. के. पॉल यांनी घरात कोरोना रुग्ण असल्यास सुरक्षित राहण्यासाठी इतरांनी देखील मास्क घालणे आवश्यक आहे. तसंच घरात मास्क घालण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी डबल मास्क लावण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. तर जाणून घेऊया डबल मास्क नेमका कसा घालायचा? त्यावेळेस कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्यात….

कसा घालाल डबल मास्क?

यासंबंधितच्या सूचना अलिकेडच जाहीर करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

काय कराल?

1. डबल मास्कमध्ये सर्जिकल मास्क आणि डबल किंवा ट्रिपल लेअर कपड्याचा मास्क असावा.

2.. मास्कमुळे आपल्याला श्वास घेण्यात कोणताही त्रास होत नाही, हे सुनिश्चित केले पाहिजे.

3.. कपड्याचा मास्क नियमितपणे धुवा.

काय टाळाल?

4.. डबल मास्कसाठी एकाच प्रकारचे दोन मास्क जोडू नका.

5.. सलग दोन दिवस एकच मास्क घालू नका.

6. मास्क आपल्या नाकावर कसून दाबू नका.

कोविड-19 ची लस घेतलेल्यांवरील काही निर्बंध इतर देशांमध्ये शिथील करण्यात आले आहेत. मात्र अद्याप आपल्याकडे अशा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा प्रकराच्या घोषणा करणे म्हणजे अतिघाई होईल, असे भारत सरकारच्या अधिकाऱ्यांचे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जोपर्यंत देशात अधिकाधिक लोाकांचे लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या त्रिसुत्रीचे पालन करणे योग्य ठरेल. (वाचा : दोन वेगवेगळ्या कोरोना लशीचे डोस घेतले तर काय होईल ?)

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024