ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

IPL वर साम्राज्य मुंबईचेच …

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

आयपीएल स्पर्धेत अद्भुत सातत्याची कमाल दाखवत मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदावर कब्जा केला. तेराव्या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीला नमवत बाजी मारली.खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदाची कमाई केली.

तरी आपण जाणून घेऊ या वेळेस मुंबई इंडियन्स संघ IPL मध्ये पूर्णपणे आपला दबदबा राखण्यात कसल्या प्रकारे यशस्वी झाला .

इशान किशन-सूर्यकुमार यादव जोडी जमली रे !!!

भारतासाठी न खेळलेल्या या दोन खेळाडूंनी यंदाच्या हंगामात धावांचा रतीब घातला. इशानने 516 तर सूर्यकुमारने 480 रन्स केल्या. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या दोघांनी जबाबदारी ओळखून खेळ केला. इशानने फिटनेसवर लक्ष दिलं तसंच जास्तीत जास्त षटकार कसे लगावता येतील यावर काम केलं. हंगामात सर्वाधिक षटकार (30) लगावण्याची किमयाही इशानने केली. सोबतच सलामी फलंदाज डीकॉक ( QINTON DE COCK ) याने ताबडतोड फलंदाजी केली . इशांत किशन , डीकॉक व सुर्यकुमार यादव हे सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अनुक्रमे 5 ,6 व 7 व्या क्रमांकावर होते .

- Advertisement -

रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यानंतर इशानला सलामीला पाठवण्यात आलं. नवीन बॉलचाही समर्थपणे सामना करू शकतो हे इशानने दाखवून दिलं. U19 संघाचा कॅप्टन असलेल्या इशानने भरपूर रन्स करत टीम इंडियासाठी दावेदारी सिद्ध केली आहे.

बुमराह-बोल्टचा धसका …

गेल्या वर्षी ट्रेंट बोल्ट दिल्ली संघाचा भाग होता. दिल्लीने ट्रेडऑफमध्ये बोल्टला मुंबईला दिलं. दिल्लीने जे गमावलं ते मुंबईने पुरेपूर कमावलं. पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये बॅट्समन मोठ्या धावसंख्येचा पाया रचतात. मात्र ट्रेंट बोल्टने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स (16) मिळवत मुंबईच्या विजयाचा पाया रचला.सोबतच बोल्टने पॉवर प्लेअर ऑफ टूरनामेंट ( POWER PLAYER OF TOURNAMENT ) हा पुरस्कार पटकावला . जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ झाला आहे. संघाला जशी गरज असेल त्यावेळी बॉलिंग करत रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्हीमध्ये बुमराहचं वर्चस्व अधोरेखित झालं. जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट सर्वात जास्त विकेट्स घेणारे अनुक्रमे 2 व 3 क्रमांकाचे खेळाडू ठरले .

हार्दिक-पोलार्डची तुफान फटकेबाजी ***

सलामीवीर आणि मधल्या फळीने उभ्या केलेल्या पायावर कळस चढवण्याचं महत्त्वपूर्ण काम या जोडगोळीने यंदाच्या हंगामात केलं.हार्दिक यंदा विशेषज्ञ बॅट्समन म्हणून खेळत होता. हार्दिकने यंदाच्या हंगामात 179.98च्या स्ट्राईक रेटने 281 रन्स केल्या. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये बॅटिंगला येत तुफान फटकेबाजी करण्याचं काम हार्दिकने चोखपणे केलं. हार्दिकने 14 चौकार आणि 25 षटकार लगावत फिनिशर म्हणून सिंहाचा वाटा उचलला. हार्दिकच्या बरोबरीने कायरेन पोलार्डने चौकार-षटकारांची लयलूट केली.सोबतच कायरेन पोलार्डने सुपर स्ट्रायकर ऑफ टूरनामेंट ( SUPER STRIKER OF TOURNAMENT ) हा पुरस्कार पटकावला .

रोहितचं प्रभावी नेतृत्व ¢¢¢

कर्णधार म्हणून पाचव्या जेतेपदासह रोहित शर्माचं नेतृत्व किती खणखणीत आहे हे सिद्ध झालं. बॉलिंगमध्ये योग्यवेळी बदल करणं, फिल्डिंग सेट करणं, प्रतिस्पर्धी संघाने आक्रमण केल्यानंतर संघाचं मनोधैर्य वाढवणं, पराभव पदरी पडल्यास संघाची मोट बांधून ठेवणं अशा सगळ्या आघाड्या रोहितने चोखपणे सांभाळल्या. बोल्टचा पॉवरप्लेसाठी, बुमराहचा शेवटच्या ओव्हर्ससाठी उपयोग करून घेणं, खेळपट्टीचा नूर ओळखून स्पिनर्सना आणणं, योग्य फिल्डर योग्य ठिकाणी उभा करणं यामध्ये रोहित माहीर आहे. दडपणाच्या क्षणीही आक्रस्ताळं न होता योग्य निर्णय घेण्यात तो वाकबगार आहे.

चतुर डावपेच ★★★

डावपेचांच्या बाबतीत मुंबईने वस्तुपाठ सादर केला. ‘लाईक अ लाईक रिप्लेसमेंट’ यासंदर्भात मुंबईने खूप काम केलं. ट्रेंट बोल्टसाठी मिचेल मक्लेघान तर जेम्स पॅटिन्सनसाठी नॅथन कोल्टिअर नील असं मुंबईचं तंत्र होतं. फास्ट बॉलर दुखापतग्रस्त होण्याची शक्यता असते.बुमराह मुख्य बॉलर असल्याने त्याला छोट्या स्पेलमध्ये वापरण्यात आलं. लसिथ मलिंगाने वैयक्कित कारणास्तव माघार घेतल्यानंतर मुंबईने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सनला ताफ्यात घेतलं. पॅटिन्सन दर्जेदार फास्ट बॉलर आहे मात्र ट्वेन्टी-20 प्रकारात तो मर्यादित खेळला आहे. युएईतल्या खेळपट्यांवर मुंबईने पॅटिन्सनला नियमितपणे खेळवलं. पॅटिन्सनने 11 विकेट्स घेताना रन्स रोखत संघाचा विश्वास सार्थ ठरवला.

एकही मॅच न खेळता बदली खेळाडू म्हणून भन्नाट कॅचेस, रनआऊट्स करणाऱ्या अनुकूल रॉयने मनं जिंकली. बदली खेळाडू कोण असेल हेही मुंबईचं ठरलेलं होतं.या सर्व कारणांमुळे मुंबई इंडियन्स संघाने DREAM11 IPL2020 मध्येआपले एकहाती वर्चस्व राखून विजेते पद पटकावले . हे मुंबई संघाचे 5 वे विजेते पदक होते . कॅप्टन रोहित शर्मा IPL इतिहासात एकही फायनल न हरणार कॅप्टन म्हणून कायम आहे व सोबतच IPL मधील सर्वात जास्त यशस्वी खेळाडू व कॅप्टन रोहित आहे .

IPL बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक ( LINK ) वर क्लिक( CLICK ) करा . सोबतच वाचत राहा STAY UPDATED …

तुम्हांला आमचा लेख कसा वाटला हे कमेंटमध्यें नक्की कळवा.

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024