ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Motivational Story : शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला; जाणून घ्या पोलीस उपायुक्त आकाश कुल्हारींची प्रेरक कथा

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Share post:

10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेनं माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो’, पोलीस उपायुक्त पदावर पोहोचलेले IPS आकाश कुल्हरी सांगतात.

आपल्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावं, चांगलं करिअर निवडून त्यात भरपूर प्रगती करावी,अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. यासाठी पालक शालेय जीवनापासूनच पाल्यांवर लक्ष केंद्रीत करतात. पाल्यांवर देखील पालकांच्या अपेक्षांचं मोठं ओझं असतं. त्यात जर पाल्य 10 वी किंवा 12 वीची परीक्षा देणार असेल तर पाल्य आणि पालकांना (Career pressure) मोठं टेन्शन असतं. चांगले मार्क मिळतील का, त्यानंतर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल का असे एक ना अनेक प्रश्न चिंतेत भर टाकत असतात. परंतु,आपल्या समाजात अशी काही उदाहरणे आहेत की ज्या मुलांना कौटुंबिक आधार,अर्थिक आधार, चांगले, दर्जेदार शिक्षण आदी गोष्टींचा अभाव असूनही अशा मुलांनी प्रयत्न, जिद्द आणि कष्टाच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. आज आपण अशाच एका जिद्दी मुलाची कहाणी वाचणार आहोत की ज्याला कधीच चांगले मार्कस मिळाले नाहीत तरी त्याने प्रयत्नांची पराकष्ठा केली आणि आज हाच मुलगा आयपीएस ऑफिसर (IPS Officer) झाला आहे. जाणून घेऊ या या मुलाच्या प्रवासाविषयी…

या मुलाला कमी मार्कस मिळतात म्हणून शाळेने काढून टाकले. परंतु, आज हाच मुलगा कष्टांच्या जोरावर आयपीएस झाला आहे. ही कथा आहे कानपूरच्या अतिरिक्त पोलिस कमिशनर आकाश कुल्हारी (Akash Kulhari) यांची. IPS आकाश कुल्हारी हे मूळचे राजस्थानमधील (Rajasthan) बीकानेर (Bikaner)जिल्ह्यातले आहेत. त्यांचे वडील पशुवैद्यक होते. त्यांच्या शालेय शिक्षणास बिकानेर शहरातील बिकानेर सीबीएसई स्कूलमधून सुरुवात झाली. 1996 मध्ये केवळ 57 टक्के मार्कस मिळवत ते मॅट्रिक पास झाले. पहिला प्रयत्न कमकुवत ठरल्यानं आणि कमी मार्क मिळाल्यानं त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. एका मुलाखतीत आकाश सांगतात की अगदी सामान्य मुलगा होतो. इयत्ता 10 वी चा निकाल पाहून मला शाळेतून काढून टाकण्यात आलं. पण या घटनेनं माझा आत्मविश्वास जागृत झाला आणि कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो.

- Advertisement -

त्यानंतर कुटुंबीयांनी अथक परिश्रम घेत त्यांना बिकानेर केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. यावेळी कठोर मेहनत करत आकाश यांनी इंटरमिजिएट परीक्षेत 85 टक्के गुण मिळवले. 2001 मध्ये पुढील शिक्षण त्यांनी दुग्गल महाविद्यालयातून घेत कॉमर्समध्ये पदवी मिळवली. त्यानंतर जेएनयू दिल्ली (JNU Delhi)येथील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एम.कॉम केले. याच दरम्यान त्यांनी सिव्हील सर्व्हिसचा अभ्यास सुरु केला. तसेच 2005 मध्ये एम.फील पण पूर्ण केले. मार्क कमी मिळाले म्हणून शाळेतून काढून टाकण्यात आलेले आकाश 2006 मध्ये सिव्हिल सर्व्हिसची (Civil Service)परीक्षा पास झाले. सुरुवातीला अभ्यासापेक्षा खेळण्यात जास्त लक्ष दिल्याचे सत्य त्यांनी स्विकारले. पदवी घेण्यापूर्वी त्यांच्यापुढे कोणतेही लक्ष्य नव्हते. परंतु,त्यानंतर त्यांनी आपले लक्ष्य ठरवले आणि त्यात यश मिळवले.

कोणत्याही गोष्टी समोर हार मानायची नाही,हा माझा स्वभाव असल्याने मी हे यश संपादन करू शकलो, असे आकाश कुल्हारी आवर्जून स्पष्ट करतात.

- Advertisement -

Related articles

राष्ट्रपतीबद्दल संपूर्ण माहिती । Information about the President in Marathi

भारताच्या संविधानातील तरतुदीनुदार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती हे भारतीय तीनही(नौदल, भूदल, वायुदल) दलाचे सरसेनापती असतात.

शेतीविषयी माहिती मराठीमध्ये । Agriculture Information in Marathi

शेतीविषयी माहिती (Agriculture Information in Marathi) : आपला भारत देश हा कृषिप्रधान म्हणजेच शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येने लोक शेती करत आहेत.

Set 5 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...

Set 4 – GCC TBC मराठी टायपिंग महत्वाचे MCQ । GCC – TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers

मित्रानो, खाली तुमच्यासाठी GCC TBC Marathi Typing Important Objective Questions and Answers दिलेले आहेत. हि टेस्ट सोडविण्यासाठी Start...
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024