पालक पनीर भाजी ही स्वादिष्ट तर असतेच पण सोबत या भाजीतून आपल्याला व्हिटॅमिन्स , कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात मिळतात . मुख्यतः या भाजीचा समावेश मुलांच्या खाण्यात करावा कारण मुलांच्या आहारात पालेभाज्याचा समावेश असणे आवश्यक आहे . परंतु मुख्यतः लहानमुळे पालेभाज्या खात नाहीत . तरी या भाजीचा उपयोग होऊ शकतो .
महाराष्ट्रातील मृदा वैशिष्ट्यपूर्ण आहे .ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग वेगळे वेगळे पडतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मृदा आहेत . खरे तर महराष्ट्रात गाव बदलले की भाषा व माती दोन्हीपण बदलतात ही तर म्हणच आहे . महाराष्ट्रातील शेती ( AGRICULTURE ) व वनांचा ( FOREST ) अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातील मृदेचा अभ्यास आवश्यक आहे .
महाराष्ट्र हे भारतातील मध्यवर्ती राज्य आहे जे उत्तर भारत व दक्षिण भारतयांना एकत्र करण्याचे काम करते. भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो .
महाराष्ट्र हे भारताच्या 28 राज्यांपैकी एक आहे . महाराष्ट्राचा विस्तार 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त अक्षांश तर 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त रेखांश असा आहे . महाराष्ट्राचा भाग हा भारताच्या मध्यभागात आहे जो उत्तर भारत व दक्षिण भारताला एकत्र करण्याचे काम करतो . महाराष्ट्राच्या राजकीय सीमा विविध राज्यांना लागतात .
महाराष्ट्रातील नद्यांना 2 भागांमध्ये विभाजित केले जाते. सह्याद्री पर्वत रांग ही मुख्य जलविभाजक म्हणून कार्य करते त्यामुळे पूर्व वहिनी व पश्चिम वाहिनी नद्या असे विभाजित केले जाते . दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महराष्ट्रात उगम पावते . ही पूर्व वहिनी नदी म्हणून ओळखली जाते .