जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्या यादीत ब्रह्मपुत्रा नदीचा समावेश होतो . ही नदी चीन , भारत व बांगलादेश या देशांतून वाहते . या नदीचा जगात लांबी नुसार 15 वा तर आकारानुसार 9 वा क्रमांक येतो .जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेला कांचनजुंगा हा ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आहे . ही नदी मुख्यतः एका प्रवाहात वाहत नाही तर सोबत अनेक प्रवाह घेऊन वाहते . या प्रकारच्या नद्यांना ब्रेडेड नद्या ( BREADED RIVERS ) म्हणून ओळखल्या जातात .
भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून गंगा नदीचा उल्लेख केला जातो. तसेच भारतातील सर्वात जास्त प्रवाह क्षेत्र हा गंगा नदीचा आहे
.गंगा नदी प्रणाली उत्तरेकडे हिमालय पर्वताचा मध्य भाग आणि दक्षिण भारतीय द्वीपकल्प पठाराचा उत्तर भाग यांच्या दरम्यान आहे. प्रामुख्याने याच मैदानी प्रदेशाला गंगा मैदान असे संबोधले जाते. भारतीय भौगोलिक क्षेत्रफलापैकी 26.2% क्षेत्र गंगा नदी प्रणालीने व्यापले आहे. गंगा नदीचे दुसरे नाव भागीरथी हे आहे .
मुख्यतः राज्यपाल हा विधिमंडलातील एक महत्वपूर्ण घटक आहे . राज्यपाल हा राष्ट्रपतींचा राज्यातील प्रतिनिधी असतो .
राज्यपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे. राज्यपाल हा जनतेचे प्रतिनिधित्व करत नाही .
विधानपरिषद हे घटक राज्याचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह आहे.राष्ट्रपतीची निवडणूक, घटना दुरुस्तीचे विधेयक यामध्ये विधान परिषदेस स्थान असते.सर्वाधिक विधानपरिषद सदस्य क्षमता असलेली राज्ये उत्तर प्रदेश (१००), महाराष्ट्र (७८),बिहार (७५) व आंध्र प्रदेश (५८) हे आहेत.
आयपीएल स्पर्धेत अद्भुत सातत्याची कमाल दाखवत मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदावर कब्जा केला. तेराव्या हंगामाच्या फायनलमध्ये मुंबईने दिल्लीला नमवत बाजी मारली.खेळाडू, कर्णधार, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांच्या बळावर मुंबईने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपदाची कमाई केली.
IPL ही जगातील सर्वात अवघड व प्रसिद्ध T-20 लीग म्हणून ओळखली जाते . जगातील सर्वोत्तम खेळाडू विविध संघांकडून IPL मध्ये खेळतात . IPL चे नियोजन भारतीय क्रिकेट नियोजन बोर्ड ( BCCI ) करते.