मराठे काटक , शूर , धाडसी व स्वाभिमानी होते . मोठ्या मोठ्या लढायांमध्ये पराक्रम गाजवण्यात त्यांना गर्व वाटे . त्या काळात मराठा सरदार फौजबंद असत . कोणताही फौजबंद सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला चाकरीत ठेवी . त्यांना सरदारकी किंवा जहागिरी देई . जहागीर दिल्यावर सरदार स्वतःला त्या भागाचा छोटा राजाच समजत असे . विजापूरचा आदिलशाही व अहमदनगरची निजामशाही यांमध्ये अनेक मराठा सरदार होते .
आपण कायम शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो , त्यांच्या पुतळ्याचे पूजन करतो, त्यांना देव मानतो .मग प्रश्न असा निर्माण होतो की कोण होते शिवाजी महाराज ?? नेमके त्यांच्या कर्तृत्व काय ?? माणूस त्याच्या कर्तृत्वावर देवपदावर जाऊ शकतो का ?? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे शिवचरित्र .....