मित्रांनो, चला आज आपण जाणून घेऊया, पवनचक्की नेमकी विदुयत निर्मिती कशी करते? आपल्याला सगळ्यात अगोदर आपले ऊर्जास्रोत कोणते आहेत व त्याचे प्रकार किती आहेत...
भारतीय उपखंडातील सर्वात महत्वाचे नदीप्रणाली पैकी एक म्हणून सिंधू नदीचा उल्लेख येतो. भारताला हिंदुस्थान व इंडिया(India) हे नाव याच नदीवरून पडले होते. जगातील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती याच नदीच्या खोऱ्यात अस्तित्वात होती. भारतीय उपखंडातील समाजावर सिंधू नदीचा मोठा प्रभाव आहे. ही नदी मुख्यतः भारताच्या उत्तरेतून काश्मिर मधून वाहते व गिलगिट बालचीस्थान भागातून पाकिस्तान मध्ये जाते.
भारतामध्ये नद्यांचे महत्व अनन्य साधारण आहे . भारतीय समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी भारतातील नद्यांचा भूगोल जाणून घेणे आवश्यक आहे. या कारणामुळे हा विषय स्पर्धा परीक्षेत अत्यंत महत्वाचा मानला जातो.