ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

संपूर्ण शिवचरित्र

शिवचरित्र भाग – 8 (अफजलखानाचा वध)

शिवरायांच्या हालचाली जास्तच वाढल्या . आता आदिलशहाला आपल्या राज्याची चिंता वाटू लागली . कारण मुघलांची सत्ता दक्षिणेत पूर्णपणे पसरली नव्हती परंतु शिवाजी महाराजांनी संपूर्ण लक्ष आदिलशाही किल्ल्यावर दिले होते .आदिलशाही दरबारात आदिलशहाच्या आईने म्हणजे बड्या बेगमसहीबा यांनी प्रश्न मांडला ‛ कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त ?’ दरबारात पूर्ण शांतता झाली . तेवढ्यात एक धिप्पाड सरदार उठला व त्याने शिवाजीला पकडून आणण्याचा विडा उचलला . तो म्हणजे अफजल खान ..

शिवचरित्र भाग – 7 ( स्वकीय की परकीय )

शिवरायांचे कर्तृत्व आत्ता पर्यंत संपूर्ण मावळ भागात पसरले होते . सर्वत्र त्यांची ओळख होऊ लागली होती . मावळातील गरीब लोग त्यांना आता येऊन मोठ्या प्रमाणावर मिळत होती . शिवराय म्हणजे त्यांचा एका प्रकारे जीव की प्राण होऊ लागले . परंतु हे मात्र मावळ भागातील सरदारांना खपले नाही . त्यांनी शिवरयांविरुद्ध वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या . राजांना याचा काही त्रास नव्हता परंतु या सरदारांनी स्वराज्याला हानी करण्याचे काम करू लागले . तळपायाची आग मस्तकात जावी या प्रमाणे शिवरायांनी आपल्या मावळ भागातील स्वकीय सरदारांचा बिमोड करण्याचे ठरवले .

शिवचरित्र भाग – 6 ( तोरण स्वराज्याचे )

शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या भागाची सुभेदारी होती . परंतु या जहागिरीतील सर्व किल्ले आदिलशहाच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते . शिवरायांना माहीत होते की किल्ल्याशिवाय आपल्या राज्याची ताकत वाढत नाही व जर आपल्याला आदिलशाही व मुघल असल्या मोठ्या ताकटवर राज्यांसोबत लढायचे असेल तर गड-किल्ले जिंकणे गरजेचे आहे . त्यांनी किल्य्यांचे महत्व ओळखले होते .

शिवचरित्र भाग – 5 ( प्रतिज्ञा स्वराज्यस्थापनेची )

पुण्याच्या नैऋत्येस रायरेश्वराचे रमणीय देवस्थान आहे . याचं मंदिरात 1645 मध्ये इतिहास बदलणारी घटना घडणार होती .शिवरायांना पुणे सुभेदारीचे अधिकार मिळाले होते . सर्व काही ठीक चालू होते परंतु जिजाबाई यांनी त्यांच्या डोक्यात स्वराज्याची संकल्पना घालून दिली होती . या कारणामुळे त्यांना आपले राज्य , लोकांचे राज्य , स्वराज्य या संकल्पनेने झपाटून टाकले होते

शिवचरित्र भाग – 4 ( सुरवात राजांच्या शिक्षणाची )

शहाजीराजांनी बंगळूरमध्ये आपला दरबार सुरू केला . तेथे त्यांनी अनेक भाषांचे पंडित , कलावंतांना आश्रय दिला . स्वतः शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते . शिवरायांच्या शिक्षणासाठी त्यांनी हुशार शिक्षकांची निवड केली . वयाच्या 7व्या वर्षांपासून शिवरायांचे शिक्षण सुरू झाले . लवकरच शिवाजी वाचण्या लिहिण्यात पारंगत झाले . आता वेळ होती युद्धकलेची वयाच्या 12 व्या वर्षी त्याना युद्धकलेची शिक्षण सुरू केले गेले . घोड्यावर बसने , कुस्ती खेळणे , दांडपट्टा फिरवणे , तलवार चालवणे या विद्या शिकण्यास प्रारंभ झाला .

शिवचरित्र भाग – 3 (शिवरायांचे बालपण)

जेंव्हा मुगल व आदिलशाही मिळून निजामशाहीला मिटवण्यासाठी निघाले होते त्याच काळात जिजाबाई गरोदर होत्या . निजामशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणून शहाजीकडे पाहिले जात होतं . या काळात पत्नीला सुरक्षित करून आपल्या कामगिरीवर जाण्याचे शहाजीनी ठरवलं . परंतु सुरक्षित असे ठिकाण पुणे सुभ्यात कोणते ? तर शिवनेरी किल्याचे नाव समोर आले . असल्या परिस्थिती जिजाबाईना शिवनेरी किल्यावर ठेवून शहाजी आपल्या मोहिमेवर गेले .
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024