पुण्याच्या नैऋत्येस रायरेश्वराचे रमणीय देवस्थान आहे . याचं मंदिरात 1645 मध्ये इतिहास बदलणारी घटना घडणार होती .शिवरायांना पुणे सुभेदारीचे अधिकार मिळाले होते . सर्व काही ठीक चालू होते परंतु जिजाबाई यांनी त्यांच्या डोक्यात स्वराज्याची संकल्पना घालून दिली होती . या कारणामुळे त्यांना आपले राज्य , लोकांचे राज्य , स्वराज्य या संकल्पनेने झपाटून टाकले होते
शहाजीराजांनी बंगळूरमध्ये आपला दरबार सुरू केला . तेथे त्यांनी अनेक भाषांचे पंडित , कलावंतांना आश्रय दिला . स्वतः शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते . शिवरायांच्या शिक्षणासाठी त्यांनी हुशार शिक्षकांची निवड केली . वयाच्या 7व्या वर्षांपासून शिवरायांचे शिक्षण सुरू झाले . लवकरच शिवाजी वाचण्या लिहिण्यात पारंगत झाले . आता वेळ होती युद्धकलेची वयाच्या 12 व्या वर्षी त्याना युद्धकलेची शिक्षण सुरू केले गेले . घोड्यावर बसने , कुस्ती खेळणे , दांडपट्टा फिरवणे , तलवार चालवणे या विद्या शिकण्यास प्रारंभ झाला .
जेंव्हा मुगल व आदिलशाही मिळून निजामशाहीला मिटवण्यासाठी निघाले होते त्याच काळात जिजाबाई गरोदर होत्या . निजामशाहीचे मुख्य आधारस्तंभ म्हणून शहाजीकडे पाहिले जात होतं . या काळात पत्नीला सुरक्षित करून आपल्या कामगिरीवर जाण्याचे शहाजीनी ठरवलं . परंतु सुरक्षित असे ठिकाण पुणे सुभ्यात कोणते ? तर शिवनेरी किल्याचे नाव समोर आले . असल्या परिस्थिती जिजाबाईना शिवनेरी किल्यावर ठेवून शहाजी आपल्या मोहिमेवर गेले .
मराठे काटक , शूर , धाडसी व स्वाभिमानी होते . मोठ्या मोठ्या लढायांमध्ये पराक्रम गाजवण्यात त्यांना गर्व वाटे . त्या काळात मराठा सरदार फौजबंद असत . कोणताही फौजबंद सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला चाकरीत ठेवी . त्यांना सरदारकी किंवा जहागिरी देई . जहागीर दिल्यावर सरदार स्वतःला त्या भागाचा छोटा राजाच समजत असे . विजापूरचा आदिलशाही व अहमदनगरची निजामशाही यांमध्ये अनेक मराठा सरदार होते .
आपण कायम शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतो , त्यांच्या पुतळ्याचे पूजन करतो, त्यांना देव मानतो .मग प्रश्न असा निर्माण होतो की कोण होते शिवाजी महाराज ?? नेमके त्यांच्या कर्तृत्व काय ?? माणूस त्याच्या कर्तृत्वावर देवपदावर जाऊ शकतो का ?? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ते म्हणजे शिवचरित्र .....